Monday, February 09, 2026 01:41:57 PM

Delhi Beating Retreat Ceremony: शौर्य, शिस्त अन् संगीताचा महासंगम; दिल्लीतील 'बीटिंग रिट्रीट' सोहळ्याने देशवासीय मंत्रमुग्ध

भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, एकता आणि शिस्तीचे दर्शन घडवत, चार दिवसांच्या प्रजासत्ताक दिन उत्सवाची अधिकृत सांगता झाली.

delhi beating retreat ceremony शौर्य शिस्त अन् संगीताचा महासंगम दिल्लीतील बीटिंग रिट्रीट सोहळ्याने देशवासीय मंत्रमुग्ध

Delhi Beating Retreat Ceremony : देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा आज सूर्यास्ताच्या वेळी अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने समारोप झाला. राजधानीतील ऐतिहासिक रायसीना हिल्स आणि विजय चौक परिसर पुन्हा एकदा 'बीटिंग रिट्रीट' (Beating Retreat) सोहळ्याचा साक्षीदार बनला. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्य, एकता आणि शिस्तीचे दर्शन घडवत, चार दिवसांच्या प्रजासत्ताक दिन उत्सवाची अधिकृत सांगता झाली.

विजय चौकात भारतीय सुरांचा निनाद
प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसांनी, म्हणजेच 29 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या या समारंभाला राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भारतीय सेना, नौदल, हवाई दल, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) बँड पथकांनी सादर केलेल्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.

हेही वाचा - Liquor Smuggling : चक्क महिला करत होत्या रेल्वेतून दारूची तस्करी! हायटेक रॅकेट उद्ध्वस्त; कुठे चालला होता हा प्रकार?

काय आहे 'बीटिंग रिट्रीट'चे महत्त्व?
'बीटिंग रिट्रीट' म्हणजे सैन्याचे आपल्या बॅरेकमध्ये (तळावर) परतणे. ही एक शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा आहे. राष्ट्रपतींच्या आगमनानंतर त्यांना राष्ट्रीय सलामी दिली जाते आणि तिरंगा फडकवला जातो. यावेळी तिन्ही दलांचे बँड पारंपारिक धूनवर एकत्रितपणे संचलन करतात. कार्यक्रमाच्या शेवटी 'रिट्रीट बिगुल' वाजवला जातो. त्यानंतर बँडमास्टर राष्ट्रपतींकडे जाऊन बँड मागे घेण्याची औपचारिक परवानगी घेतात आणि तिरंगा सन्मानाने खाली उतरवला जातो.

इतिहास आणि जागतिक संदर्भ
भारतात बीटिंग रिट्रीटची सुरुवात 1950 च्या दशकात राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या भारत भेटीदरम्यान झाली होती. तेव्हापासून हा सोहळा भारतीय सैनिकांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहणारा एक वार्षिक उत्सव बनला आहे. विशेष म्हणजे, भारताप्रमाणेच ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये ही लष्करी परंपरा आजही पाळली जाते. विजय चौकातील रोषणाई आणि भारतीय धूनच्या सादरीकरणाने या सोहळ्याने देशवासियांच्या मनात देशप्रेमाची भावना पुन्हा एकदा जागृत केली.


सम्बन्धित सामग्री