नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; नाशिकमध्ये हळहळ

राज्यातून पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; नाशिकमध्ये हळहळ

नाशिक: राज्यातून पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील औंढा नागनाथ परिसरातील म्हाळसगाव येथे एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर गणेशराव नऱ्होटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.दिनकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने नऱ्होटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून म्हाळसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

 

विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number