BMC मुख्यालयात खळबळ! महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

मुंबईच्या महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

BMC मुख्यालयात खळबळ! महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; पोलिसांसह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल
mayor’s office threatening a bomb blast

मुंबई : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी एका शाळेवर ग्रेनेड हल्ला* आणि २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा करण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये खलिस्तान आणि काही संघटनांची नावे घेण्यात आली असून, ई-मेल प्राप्त होताच मुंबई पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांकडून ई-मेलची सत्यता, तो कोणी आणि कुठून पाठवला आणि हा खरा धोका आहे का, की केवळ अफवा पसरवण्याचा प्रयत्न आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. महापौर कार्यालय, महालक्ष्मी रेसकोर्स आणि शाळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : ‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number