‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य

मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांचा ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपची फोरेन्सिक तपासणी, जरांगेंच्या दाव्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय; शिवसेनेची मागणीही मान्य
cm devendra fadnavis manoj jarange patil

नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल 500 कोटी रुपयांचा ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी या ऑडिओ क्लिपची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच भाजपच्या काही नेत्यांनीदेखील ऑडिओ क्लिपची पडताळणी करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. परिणामी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा : भयंकर! वर्क फ्रॉम होमचं आमिष अन् सुरु भलताच खेळ; मुंबईत मोठं रॅकेट उघड

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर पदवीधर निवडणुकीकरिता मी माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत आहे. मतदारांनी जास्तीत जास्त संकेत मतदान करावं असं मी आवाहन करतो. शिक्षक आणि पदवीधर या पाचही जागेवरील सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे..हा ज्येष्ठ सभागृह असल्याने ज्येष्ठांना जास्तीत जास्त मतदान करावे. जास्तीत जास्त मतदान करून आणि शांत आणि चांगल्या पद्धतीने या लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होतील असा मला विश्वास..आज मतदान असल्याने याविषयी अधिक बोलता येणार नाही. मात्र योग्य असा निकाल लागेल असा मला विश्वास आहे. स्पाय पेन काय असतं हे सुप्रियाताईंनी मला पाठवलं काय असते आणि काय चाललं ते निश्चित समजून घेईल..जे काही संभाषण समोर आलं याची पूर्ण फॉरेन्सिक तपासणी होईल.. संदर्भात त्यांना आश्वासित केला आहे.. अडीच वर्षानंतर आत्ता आहे संभाषण बाहेर येण्यामागे नेमके हेतू काय आणि कोणाला टार्गेट आणि कशाला केलं जात आहे या संदर्भातील अनेक प्रश्न आहे.. त्याच्या चौकशीची मागणी जरांगे पाटील आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.. त्याची पूर्ण चौकशी करून यातील जे सत्य असेल ते आम्ही बाहेर काढू..

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number