‘आंदोलन न करण्याविषयी कोणाला काहीही लिहून दिलेले नाही’; सुटकेनंतर अभिजित दिपकेंची सूचक पोस्ट, CJP पुन्हा…

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर पक्षाने आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
Abhijit Dipke
Abhijit Dipke

CJP Protest Latest News: कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर पक्षाने आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. जंतर मंतरच्या दिशेने आंदोलनासाठी जात असताना शनिवारी 10 ऑक्टोबर रोजी या तिघांना पोलिसांनी थेट विमानातूनच ताब्यात घेतले होते. दिवसभर संपर्काबाहेर राहिल्यानंतर आज सकाळी त्यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटकेनंतर अभिजित दिपके यांनी ‘आम्ही आंदोलन करणार नाही अशा कोणत्याही बाँडवर स्वाक्षरी केलेली नाही, आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू’ असे स्पष्ट करत लढाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांची कारवाई आणि कायदेशीर प्रक्रिया

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएनएसएसच्या कलम 126/170 अन्वये ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेतील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तिन्ही आंदोलकांना दिल्ली कँट येथील विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी (SEM) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वर्षभराच्या कालावधीसाठी शांतता आणि चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून 50,000 रुपयांचा जामीन अर्ज भरून घेण्यात आला. सीजेपीच्या कायदेशीर सल्लागार रत्ना सिंग यांच्या माहितीनुसार, शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर न्यायालयाकडून सुटका मंजूर करण्यात आली. सुटकेनंतर अभिजित दिपके यांच्या आजीचे निधन झाल्यामुळे ते अंत्यदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले आहेत.

हेही वाचा – CPM खासदाराला दिल्ली पोलिसांकडून मारहाण?; जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

सीजेपीची आक्रमक भूमिका आणि पत्रकार परिषद

दरम्यान, सीजेपीच्या नेत्यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील रणनीती जाहीर केली. देशात नागरिकांविरुद्ध परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप करत नेत्यांनी स्पष्ट केले की, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होत नाही तोवर हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. खऱ्या अर्थाने लढाई आता सुरू झाली असून पक्ष पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून विरोध दर्शवणार असल्याचे नेत्यांनी ठामपणे सांगितले.

आंदोलनाचा पुढील मार्ग

वर्षभराचा शांतता करार झाल्यामुळे आंदोलन थांबणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, दिपके यांच्या वक्तव्याने पक्षाची भूमिका स्पष्ट झाली आहे. कायदेशीर बंधने असली तरी लोकशाही मार्गाने आपले आंदोलन आणि विरोध पुढे सुरूच राहील, असा संदेश कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

हेही वाचा – SIR वरून वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगात खळबळ, रातोरात घेतला मोठा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version