Action Against Non-Hindu Employees In Tirupati Temple: तिरुपती मंदिराची प्रशासकीय संस्था असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानमने 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. या सर्वांना बदली करण्यास किंवा स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय निवडण्यास सांगण्यात आले आहे. तिरुपती मंडळाने म्हटले आहे की, त्यांच्या मंदिरांचे आणि धार्मिक कार्यांचे आध्यात्मिक पावित्र्य जपण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
तिरुपती मंदिरातील 18 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई -
टीटीडी बोर्डाने अलीकडेच अशा कर्मचाऱ्यांना सरकारी विभागात बदली करण्याचा किंवा स्वेच्छा निवृत्ती योजनेद्वारे त्यांची नोकरी सोडण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. टीटीडीचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी यापूर्वी सांगितले होते की, ते तिरुमला हिंदू श्रद्धा आणि पावित्र्याचे प्रतीक राहील याची खात्री करतील. दरम्यान, आता, त्यांच्या निर्देशांचे पालन करून, 18 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हेही वाचा - PM Modi Mahakumbh Visit: पंतप्रधान मोदींचे महाकुंभात पवित्र स्नान; देशवाशियांसाठी केली खास प्रार्थना
दरम्यान, टीटीडी बोर्डाने एका निवेदनात म्हटलं आहे की, 'जे टीटीडीद्वारे आयोजित हिंदू धार्मिक मेळे, उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत असताना गैर-हिंदू धार्मिक कार्यात भाग घेत आहेत, ज्यामुळे कोट्यवधी हिंदू भाविकांच्या पावित्र्याला, भावनांना आणि श्रद्धेला धक्का बसतो, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तथापी, मंदिरातील कर्मचाऱ्यांना भगवान वेंकटेश्वराच्या फोटो किंवा मूर्तीसमोर शपथ घ्यावी लागेल. तसेच ते हिंदू श्रद्धा आणि परंपरांचे पालन करण्याचे वचन देतील.'
हेही वाचा - अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धात FRI दाखल; यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्यासंदर्भात केलं होतं 'हे' विधान
तथापी, टीटीडीच्या दोन अधिकाऱ्यांना 18 कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पोस्टिंगची पडताळणी करण्याचे आणि त्यांना तिरुमला किंवा कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित काम किंवा पदावर तैनात केले जाणार नाही, याची खात्री करण्याचं सांगितले आहे.