Sunday, February 15, 2026 07:55:20 AM

Army Day 2026: अग्निवीर कुलबीर सिंग यांचा ऐतिहासिक पराक्रम; 'शौर्य पदक' मिळवणारे ठरले देशातील पहिले अग्निवीर

नियंत्रण रेषेवर (LoC) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावणारे अग्निवीर कुलबीर सिंग यांना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते 'सेना पदक' (शौर्य) प्रदान करण्यात आले.

army day 2026 अग्निवीर कुलबीर सिंग यांचा ऐतिहासिक पराक्रम शौर्य पदक मिळवणारे ठरले देशातील पहिले अग्निवीर

Army Day 2026: भारतीय लष्कराच्या 78 व्या स्थापना दिनानिमित्त (Army Day 2026) आयोजित सोहळ्यात एक नवा इतिहास घडला आहे. नियंत्रण रेषेवर (LoC) दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावणारे अग्निवीर कुलबीर सिंग यांना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते 'सेना पदक' (शौर्य) प्रदान करण्यात आले. शौर्य पदक मिळवणारे कुलबीर सिंग हे देशातील पहिलेच अग्निवीर ठरले आहेत.

काय होता तो थरारक प्रसंग? 

जानेवारी 2025 मध्ये, 'शीख लाईट इन्फंट्री'चे अग्निवीर कुलबीर सिंग हे नियंत्रण रेषेवरील एका फॉरवर्ड पोस्टवर तैनात होते. त्याच वेळी दहशतवाद्यांच्या एका टोळीने भारतीय सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. कुलबीर सिंग यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या लाईट मशीन गनने (LMG) दहशतवाद्यांवर जोरदार गोळीबार सुरू केला. त्यांच्या या धाडसामुळे दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आणि त्यांना पुन्हा पाकिस्तानी सीमेत पळून जावे लागले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याची दखल घेत लष्कराने त्यांना सन्मानित केले आहे.

हेही वाचा - UPSC परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल? प्रशासकीय कारणांमुळे 2026 चे नोटिफिकेशन लांबणीवर; उमेदवारांची धाकधूक वाढली

लष्करी परेड आणि सन्मान सोहळा 

यावर्षी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आर्मी डेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी (15 जानेवारी 2026) झालेल्या सोहळ्यात कुलबीर सिंग यांच्यासह इतर 10 सैनिकांनाही सेना पदक देऊन गौरवण्यात आले. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या 26 लष्करी तुकड्यांना प्रशंसापत्रे प्रदान करण्यात आली.

हेही वाचा - Salary Account Scheme: सॅलरी अकाउंटवर आता कोट्यवधींचे फायदे; केंद्र सरकारची नवीन स्किम नक्की आहे काय?

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा प्रवास 

दरम्यान, 2022 मध्ये सुरू झालेल्या 'अग्निपथ' योजनेअंतर्गत सैन्यात दाखल झालेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचा चार वर्षांचा कार्यकाळ आता पूर्णत्वाकडे आहे. यातील 25 टक्के अग्निवीरांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेच्या आधारे नियमित सैनिक म्हणून कायम केले जाणार आहे, तर उर्वरित 75 टक्के अग्निवीर राज्य पोलीस किंवा निमलष्करी दलात सेवा बजावण्यासाठी सज्ज होतील. कुलबीर सिंग यांना मिळालेल्या या पदकामुळे अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे मनोबल उंचावले असून, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री