Tuesday, February 17, 2026 08:49:58 PM

UPSC परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल? प्रशासकीय कारणांमुळे 2026 चे नोटिफिकेशन लांबणीवर; उमेदवारांची धाकधूक वाढली

यूपीएससीची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 24 मे 2026 रोजी होणार आहे. मात्र, आता नोटिफिकेशन आणि अर्ज प्रक्रियाच लांबणीवर पडल्यामुळे परीक्षेच्या तारखेतही बदल होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

upsc परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल प्रशासकीय कारणांमुळे 2026 चे नोटिफिकेशन लांबणीवर उमेदवारांची धाकधूक वाढली

UPSC Exam 2026 Notification Updates : संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयोगाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवा परीक्षेचे नोटिफिकेशन काल, 14 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे अर्ज प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्व परीक्षेची तारीख बदलणार का?
यूपीएससीची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार 24 मे 2026 रोजी होणार आहे. मात्र, आता नोटिफिकेशन आणि अर्ज प्रक्रियाच लांबणीवर पडल्यामुळे परीक्षेच्या तारखेतही बदल होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सामान्यतः अर्ज भरल्यानंतर आयोगाला परीक्षेच्या तयारीसाठी ठराविक कालावधी लागतो. तरीही, जोपर्यंत अधिकृत परिपत्रक येत नाही, तोपर्यंत उमेदवारांनी 24 मे हीच तारीख डोळ्यासमोर ठेवून आपला अभ्यास सुरू ठेवावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा - Railway Recruitment 2026: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! 312 पदांची भरती, 44 हजारांपर्यंत पगार; अर्जाची अंतिम तारीख जवळ

अशी असते परीक्षेची काठिण्यपातळी
नागरी सेवा पूर्व परीक्षेत दोन अनिवार्य पेपर असतात, जे प्रत्येकी 200 गुणांचे असतात. यामध्ये 'पेपर-1' हा मेरिटसाठी महत्त्वाचा असतो, तर 'पेपर-2' (CSAT) हा केवळ पात्रता फेरीसाठी असतो. पात्रता मिळवण्यासाठी उमेदवारांना 'पेपर-2' मध्ये किमान 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. दोन्ही पेपरमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. या पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची यादीच मुख्य परीक्षेसाठी (Mains) पात्र ठरविली जाते.

पुढील नोटिफिकेशनची तारीख आयोग लवकरच आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल. प्रशासकीय अडथळे दूर होताच अर्जाची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांना केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विलंबामुळे अभ्यासासाठी थोडा अतिरिक्त वेळ मिळण्याची शक्यता असली, तरी गाफील न राहता आपली रणनीती अधिक मजबूत करणे हिताचे ठरेल.

हेही वाचा - India Education Update: आता घरबसल्या बना 'डेटा सायंटिस्ट'; IGNOU कडून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू


सम्बन्धित सामग्री