Thursday, July 17, 2025 03:23:53 AM

Ahmedabad Plane Crash: ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली? अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेला उधाण

अहमदाबाद विमान अपघातात 241 मृत्यू, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अंत; महिला ज्योतिषीचं भाकित खरे ठरल्याने खळबळ, तांत्रिक बिघाड प्राथमिक कारण मानलं जातंय.

 ahmedabad plane crash ज्योतिषीची भविष्यवाणी खरी ठरली अहमदाबाद विमान अपघातानंतर चर्चेला उधाण

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. एअर इंडियाच्या फ्लाईट-171 या विमानाचा टेक-ऑफनंतर काही मिनिटांतच अपघात होऊन भीषण स्फोट झाला. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, परंतु केवळ एक प्रवासी बचावल्याची माहिती आहे. मृतांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

या अपघातामागचं नेमकं कारण अजूनही समोर आलेलं नसून, ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली असावी. अपघात इतका भयावह होता की विमान एका इमारतीवर आदळल्यावर त्यात भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: 'डीजीसीएने बंदी का घातली नाही?' राज ठाकरेंचा सवाल

या अपघातानंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. एका महिला ज्योतिषीने काही दिवसांपूर्वीच अशा अपघाताचा इशारा दिला होता. 'अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा' नावाच्या या महिला ज्योतिषीने 5 जून रोजी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने 2025 साली भारतात एक मोठा विमान अपघात होईल, असे भाकित केले होते. तिने हे नक्षत्रांच्या अभ्यासावरून सांगितले होते आणि आपण या भाकितावर ठाम असल्याचेही स्पष्टपणे नमूद केले होते.

त्याच ट्विटमध्ये तिने इस्रोबाबतही भविष्यवाणी केली होती की, भारताची ही अवकाश संस्था आगामी काळात आश्चर्यजनक प्रगती करेल आणि जागतिक स्तरावर भारताची छाप पाडेल. परंतु सध्या सर्वांचे लक्ष तिच्या अपघातासंदर्भातील भाकिताकडेच लागले आहे.

हेही वाचा:Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत चमत्कारिक बचाव; प्रवासी विश्वशकुमार रमेश यांनी सांगितला जीवघेणा अनुभव

या घटनेनंतर शर्मिष्ठा यांचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत तिचं भाकित खरं ठरल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर हे दैवी संकेत मानले आहेत, तर काहीजण हे निव्वळ योगायोग मानत आहेत.

दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह अतिशय जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण जात आहे. त्यामुळे नातेवाईकांना डीएनए नमुने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाचे पथक सतत काम करत असून, शक्य तितक्या लवकर मृतांच्या ओळखी पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हवाई सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच, अशा दुर्दैवी घटनांवर ज्योतिषशास्त्राच्या आधारे भाकित वर्तवले जाऊ शकते का? या प्रश्नावरही चर्चा झडू लागली आहे.
 


सम्बन्धित सामग्री