Wednesday, July 09, 2025 08:40:02 PM

Air India Emergency Landing: एअर इंडिया फ्लाइटला बॉम्बची धमकी? फुकेट-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग

फुकेटहून दिल्लीकडे जाणाऱ्या AI 379 फ्लाइटला बम धमकी मिळाल्याने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 156 प्रवासी सुरक्षित. अहमदाबाद अपघातानंतर 24 तासात दुसरी मोठी घटना.

air india emergency landing एअर इंडिया फ्लाइटला बॉम्बची धमकी फुकेट-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग

Air India Emergency Landing: थायलंडच्या फुकेट येथून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट AI 379 ला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या फ्लाइटमध्ये 156 प्रवासी प्रवास करत होते. टेकऑफनंतर विमानाला बम असल्याची धमकी मिळाल्याने वैमानिकांनी तातडीने अंदमान सागरावर काही वेळ हवेत चक्कर घेतल्यानंतर विमान पुन्हा फुकेट विमानतळावर उतरवले. ही घटना अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर अवघ्या 24 तासांत घडल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

विमानात बॉम्ब असल्याची धमकी 

रॉयटर्सच्या अहवालानुसार, एअर इंडिया फ्लाइट AI 379 फुकेटहून दिल्लीकडे रवाना झाली होती. टेकऑफनंतरच बॉम्ब धमकी मिळाल्याने, वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून विमान अंदमान सागरावर काही वेळ हवेत चकरा मारत ठेवले आणि नंतर सुरक्षितरित्या फुकेटमध्ये लँडिंग केली. फुकेट विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले असून कोणीही जखमी झालेले नाही. सध्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ थायलंड (AOT) कडून बॉम्ब धमकीची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत चमत्कारिक बचाव; प्रवासी विश्वशकुमार रमेश यांनी सांगितला जीवघेणा अनुभव

इराण-इजरायल संघर्षाचा संबंध?

सध्या इजरायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इजरायलने इराणच्या अणुठिकाण्यांवर हल्ला केला असून त्यामुळे दोन्ही देशांनी आपापले हवाई क्षेत्र बंद केले आहे. परिणामी, अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत. काही सूत्रांच्या मते, या संघर्षामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बॉम्ब धमकी दिली गेली असावी, मात्र यासंबंधी अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर दुसरा मोठा हादरा

गुरुवारी अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट क्रॅश झाली होती. या दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता. या अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अपघातस्थळी भेट देऊन बचावलेल्या प्रवाशांशी संवाद साधला. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि तातडीच्या मदतीचे निर्देश दिले. अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमार रमेश यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या डोळ्यांनी पाहिलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

हेही वाचा: Ahmedabad Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटने शेवटचा कॉल कुणाला केला?

सलग दोन दिवस एअर इंडियाच्या फ्लाइट्स संबंधित गंभीर घटना घडल्यामुळे देशातील विमान वाहतूक सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. बॉम्ब धमकी असो की विमान अपघात या घटनांनी प्रशासनाची कार्यक्षमता आणि सुरक्षा उपाययोजनांची चाचणी घेतली आहे. DGCA आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तात्काळ तपास सुरू करण्यात आला असून भविष्यातील फ्लाइट सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


सम्बन्धित सामग्री