नवी दिल्ली: एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. बर्मिंगहॅमहून नवी दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक AI-114 बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सौदी अरेबियातील रियाध येथे वळवण्यात आले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, '21 जून रोजी बर्मिंगहॅमहून दिल्लीला येणारे विमान क्रमांक AI114 बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर रियाध येथे वळवण्यात आले. विमान रियाधमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून सुरक्षा तपासणी पूर्ण करण्यात आली. सर्व प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले असून त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
हेही वाचा - मोठा अपघात टळला! 'Mayday' कॉलनंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग
एअरलाइनने म्हटले आहे की, या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी तांत्रिक बिघाडामुळे इंडिगोचे एक विमान रद्द करण्यात आले होते. विमानात समस्या दिसून आल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमान बुकिंगमध्ये मोठी घट; 15 टक्क्यांनी स्वस्त झाली तिकिटे
चेन्नईला जाणाऱ्या विमानाचे बेंगळुरूमध्ये लँडिंग -
दरम्यान, शनिवारी गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे इंडिगोचे विमान चेन्नईत उतरवावे लागले, ज्यामध्ये 168 प्रवासी होते. कमी इंधन असल्याने कॅप्टनने 'मेडे' कॉल केला होता. विमानाने चेन्नईत उतरण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तेथे विमानाचे लँडिग होऊ शकले नाही. त्यानंतर, विमान बेंगळुरू विमानतळावर उतरवण्यात आले.