Thursday, July 17, 2025 02:09:57 AM

एअर इंडिया करणार 120 मिलियन डॉलर्सचा क्लेम

विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा विमा दावा करू शकते. तसेच हा भारतातील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम देखील असू शकतो.

एअर इंडिया करणार 120 मिलियन डॉलर्सचा क्लेम

अहमदाबाद: विमान अपघातानंतर एअर इंडिया कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा विमा दावा करू शकते. तसेच हा भारतातील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम देखील असू शकतो. तज्ज्ञांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कंपनी या अपघाताशी संबंधित जो इन्शुरन्स क्लेम करेल त्याची रक्कम अंदाजे 120 मिलियन डॉलर्सहून अधिक असू शकते. एअर इंडिया सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम करणार आहे. विमानाचं नुकसान, प्रवाशांचे मृत्यू यावरुन एअर इंडिया इन्शुरन्स क्लेम करणार असल्याची माहिती आहे.

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात असतानाच याच्या विम्याबाबतचे वेगवेगळे दावे माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. या अपघातानंतर एअर इंडिया ही कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा विमा दावा करू शकते. तसेच हा भारतातील सर्वात मोठा इन्शुरन्स क्लेम देखील असू शकतो.

हेही वाचा : अहमदाबाद विमान दुर्घटनेतील जखमींची पंतप्रधानांनी घेतली भेट

तज्ज्ञांच्या हवाल्याने इकोनॉमिक टाइम्सने दावा केला आहे की एअर इंडिया कंपनी या अपघाताशी संबंधित जो इन्शुरन्स क्लेम करेल त्याची रक्कम अंदाजे 120 मिलियन डॉलर्सहून (जवळपास 10,33,02,22,788 रुपये) अधिक असू शकते. इन्शुरन्समध्ये कोणत्या गोष्टी कव्हर होतात?विमान कंपन्या साधारणपणे हुल इन्शुरन्स, स्पेअर पार्ट्स इन्शुरन्स व लीगल लायबिलिटी म्हणजेच कायदेशीर जबाबदाऱ्यांसाठी इन्शुरन्स काढतात. अहमदाबादमधील विमान अपघाताच्या बाबतीत एअर इंडिया कंपनी तिन्ही गोष्टी क्लेम करू शकते. विमानाचं नुकसान व प्रवाशांचे मृत्यू या दोन्ही गोष्टी इन्शुरन्स कव्हरमध्ये येतात.


सम्बन्धित सामग्री