अमित शाहांनी केली पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी; म्हणाले, ‘भारत दहशतवादासमोर झुकणार नाही’

या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी केली.

अमित शाहांनी केली पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी; म्हणाले, ‘भारत दहशतवादासमोर झुकणार नाही’
Edited Image, X

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात दोन परदेशी पर्यटकांसह 26 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने घेतली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाममधील घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचा आणि कृती योजनेचा आढावा घेतला. दरम्यान, पंतप्रधान मोदी देखील सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. पंतप्रधान मोदी देखील आज जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याची शक्यता आहे.

भारत दहशतवादासमोर झुकणार नाही – अमित शहा 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत अमित शहा म्हणाले की, ‘भारत दहशतवादासमोर झुकणार नाही. या क्रूर दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही. आम्ही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करू आणि त्यांना कठोर शिक्षा देऊ.’ घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अमित शहा श्रीनगरला पोहोचले. त्यांनी सर्व एजन्सींसोबत सुरक्षा आढावा बैठक घेतली.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत मोठी अपडेट समोर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक – 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुढील कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल बैठकीला उपस्थित आहेत. तथापी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांच्या पार्थिवांना पुष्पांजली वाहिली आणि या भ्याड कृत्याच्या दोषींना शिक्षा होईल, असे आश्वासन दिले. 

हेही वाचा – काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’ कक्षामार्फत हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

पर्यटकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष – 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष 24 तास काम करेल. जर देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाचा ओळखीचा किंवा नातेवाईक सध्या पहलगामला भेट देण्यासाठी आला असेल आणि त्याच्याशी संपर्क साधता येत नसेल, तर तो या डेस्कच्या क्रमांकांवर संपर्क साधू शकतो. यासाठी पोलिसांनी 9596777669, 01932225870 आणि 9419051940 हे व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number