Sunday, August 17, 2025 01:52:07 PM

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना 'राज्य आपत्ती व्यवस्थापन' कक्षामार्फत हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई: पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. संपर्क क्रमांक:- 022-22027990

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24x7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे. 

काश्मीरमधील संपर्क क्रमांक:

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (24x7) मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. 
1) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

2) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397
 


सम्बन्धित सामग्री