प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याने यावर्षी जानेवारी महिन्यात प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता प्रथमच आपल्या चाहत्यांशी भावनिक संवाद साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी आपल्या श्रोत्यांसाठी खास संदेश शेअर करत प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कठोर आणि स्पर्धात्मक जगात चाहत्यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल त्याने मनापासून आभार मानले आहेत.
‘तुम ही हो’ या गाण्यामुळे जागतिक स्तरावर लोकप्रिय झालेल्या अरिजीत सिंगने त्याच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की त्याने नवीन गाणी स्वीकारणे थांबवले असले तरी आधीपासून प्रलंबित असलेल्या अनेक गाण्यांचे काम अद्याप बाकी आहे. ही सर्व अपूर्ण गाणी पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत राहतील आणि ही प्रक्रिया संपूर्ण वर्षभर किंवा पुढील वर्षापर्यंतही सुरू राहू शकते, असे त्याने नमूद केले आहे.
हेही वाचा: India US Trade Deal: कोर्टाच्या एका निर्णयाने बदलली व्यापाराची दिशा; प्रभावी अस्त्रामुळे व्यापारात भारत अमेरिकेच्या वरचढ?
अरिजीत सिंगने संदेशात त्यांनी चाहत्यांना अनावश्यक वादांपासून दूर राहण्याचा आणि शांत जीवन जगण्याचा सल्लाही दिला. सोशल मीडियावरील सततच्या चर्चांमध्ये गुंतण्यापेक्षा मनःशांती, ध्यान आणि सकारात्मकतेकडे लक्ष देण्याचे आवाहन त्याने केले आहे. “भविष्यात काय आहे हे कोणालाच ठाऊक नाही,” असे म्हणत त्याने त्याच्या आगामी प्रवासाबाबतही सूचक विधान केले आहे.
अरिजीत सिंगने 27 जानेवारी 2026 रोजी सोशल मीडियाद्वारे प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अनेक वर्षे श्रोत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत त्याने पुढे नवीन प्लेबॅक असाइनमेंट स्वीकारणार नसल्याचे सांगितले होते. मात्र संगीतनिर्मिती पूर्णपणे थांबवणार नसून स्वतंत्र कलाकार म्हणून संगीत शिकणे आणि स्वतःच्या पद्धतीने काम सुरू ठेवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती.
अरिजीतने हेही स्पष्ट केले होते की आधी घेतलेल्या प्रकल्पांशी संबंधित बांधिलकी पूर्ण केली जाईल आणि त्यामुळे आगामी काळात त्याच्या काही नवीन गाण्यांचे प्रकाशन होत राहील. निवृत्तीनंतरही अरिजीत सिंगचे संगीत चाहत्यांपर्यंत पोहोचत राहणार असल्याने त्यांच्या संदेशाने चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: JEE Main 2026: अर्ज करण्याची आज शेवटची संधी; विसरलात तर संधी हुकणार, नोंदणीची प्रक्रिया काय आहे?