Sunday, January 18, 2026 01:22:35 PM

Pahalgam Attack: असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला? इम्रान खानच्या जवळच्या सहकाऱ्याचा खळबळजनक आरोप

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत.

pahalgam attack असीम मुनीरने घडवून आणला पहलगाम हल्ला इम्रान खानच्या जवळच्या सहकाऱ्याचा खळबळजनक आरोप

Pahalgam Attack: काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानमधील लष्करी नेतृत्वाचा थेट संबंध असल्याचा नवा दावा समोर आला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि पाकिस्तानी-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सलमान अहमद यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना या कटाचा सूत्रधार ठरवत गंभीर आरोप केले आहेत. CNN-News18 शी बोलताना सलमान अहमद यांनी सांगितले की, पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला 'योजनेनुसार घडवून आणण्यात आला' आणि त्यामागे मुनीर यांचाच हात असल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताशी लष्करी संघर्ष निर्माण झाला तर मुनीर यांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत होईल आणि पाकिस्तानमध्येही त्यांना अधिक अधिकार मिळतील, या कल्पनेने हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा दावाही सलमान अहमद यांनी केला आहे. 

जनरल मुनीर यांच्यावर गंभीर मानवी हक्क उल्लंघनांचे आरोप

सलमान अहमद यांनी अमेरिकेतील 42 कायदेकर्त्यांनी स्वाक्षरी केलेल्या अलीकडील पत्राचाही उल्लेख केला. या पत्रात अमेरिकन प्रशासनाला जनरल मुनीर यांच्यावर गंभीर मानवी हक्क उल्लंघनांचे आरोप तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. अहमद यांनी सांगितले की, एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान सरकार पाडल्यानंतर पाकिस्तानमध्ये लष्कराने उघडपणे सत्ता हस्तगत केली आणि लोकशाही प्रक्रियेवर गदा आणली. असीम मुनीर हे संपूर्ण प्रदेशासाठी सुरक्षेचा धोका आहेत, असा दावा करत अहमद म्हणाले की, पाकिस्तान सारख्या अण्वस्त्रधारी राष्ट्रात मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीचे नियंत्रण असणे अत्यंत धोकादायक आहे.

हेही वाचा - India US Defence Deal : भारत अमेरिकेकडून 24 MH-60R हेलिकॉप्टर्स खरेदी करणार; तब्बल 946 दशलक्ष डॉलर्सचा संरक्षण करार

कुटुंबातील व्यक्तींचे अपहरण आणि छळ 

सलमान अहमद यांनी आणखी एक धक्कादायक आरोप करत सांगितले की, मुनीर यांच्या आदेशाने पाकिस्तानात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अपहरण करण्यात आले आहे. मुनीरला वाटते की तो पाकिस्तानचा 'राजा' बनेल. गेल्या सात आठवड्यांपासून त्याने कोणालाही इम्रान खान यांना भेटू दिले नाही. यातून त्याची क्रूर मानसिकता दर्शवते, असे अहमद यांनी यावेळी नमूद केले. 

हेही वाचा -  Putin Food Security: पुतीन खाणार नाहीत भारतीयांच्या हातचं जेवण? काय आहे कारण

पहलगाम हल्ल्यामागे भारताला युद्धासाठी चिथावणी देण्याचा उद्देश  

अहमद यांनी दावा केला की, पाकिस्तानातील निवडणुकांमधील कथित गैरव्यवहार आणि इम्रान खान यांचे राजकीय अस्तित्व दडपण्यासाठी मुनीर यांच्यावर आरोप होत असल्याने त्यांच्याविरोधात जनतेत रोष वाढत होता. हा रोष कमी करण्यासाठी आणि स्वतःचा अधिकार टिकवण्यासाठी त्यांनी भारताशी तणाव वाढवण्याचा मार्ग स्वीकारला. पहलगाम हल्ला म्हणजे भारताला बदला घेण्यासाठी उद्दाम चिथावणी होती. जर युद्ध पेटले असते तर मुनीर स्वतःला फील्ड मार्शल म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता, असा सलमान अहमद यांचा आरोप आहे.
 


सम्बन्धित सामग्री