मोठी बातमी! माजी मंत्र्यांची तुरुंगातून सुटका पण काही मिनिटांत आनंद मावळला.. ED ने घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?

जेलच्या मुख्य गेटबाहेर पाऊल ठेवताच तिथल्या बंदोबस्तात असलेल्या केंद्रीय पथक आणि ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले, ज्यामुळे माजी मंत्री आझम खान यांच्या सुटकेचा आनंद अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आला.

मोठी बातमी! माजी मंत्र्यांची तुरुंगातून सुटका पण काही मिनिटांत आनंद मावळला..  ED ने घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Azam Khan

Azam Khan ED Custody Rampur Jail: समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांना तुरुंगातून बाहेर पडताच अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपल्या ताब्यात घेतल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दोन पॅन कार्ड (Dual PAN Card) फसवणुकीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर तब्बल 11 महिन्यांहून अधिक काळ लोटल्यावर त्यांची रामपूर जिल्हा कारागृहातून सुटका झाली होती. मात्र, जेलच्या मुख्य गेटबाहेर पाऊल ठेवताच तिथल्या बंदोबस्तात असलेल्या केंद्रीय पथक आणि ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले, ज्यामुळे त्यांच्या सुटकेचा आनंद अवघ्या काही मिनिटांतच संपुष्टात आला.

जौहर युनिव्हर्सिटी आणि कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी आहे थेट संबंध
ED ने केलेली ही कारवाई वर्ष 2019 मध्ये नोंदवण्यात आलेल्या प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट (PMLA) अंतर्गत ECIR प्रकरणाशी संबंधित आहे. मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्ट आणि जौहर युनिव्हर्सिटीच्या उभारणीदरम्यान झालेल्या सुमारे 416 कोटी रुपयांच्या संशयास्पद व अघोषित आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. याशिवाय, नुकतीच 28 ऑक्टोबर रोजी ED ने या विद्यापीठाशी संबंधित सुमारे 1170 कोटी रुपयांची अचल मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती, ज्यामुळे त्यांच्यावरील कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत.

हेही वाचा – दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीचा धडक मोर्चा! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

तुरुंगाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी अन् अधिकारी व आझम खान यांच्यात शाब्दिक वाद
तुरुंगाच्या बाहेर आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी समाजवादी पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ED ची वाहने पाहून समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान आझम खान आणि उपस्थित ED च्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. तथापि, सर्व सुरक्षा यंत्रणांचा ताफा आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या (CRPF) तुकडीच्या पहारेत अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने आपल्या गाडीत बसवले.

चिरंजीव अब्दुल्ला आझम घरी रवाना; ED कडून गाझियाबाद न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया
याच प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेले आझम खान यांचे चिरंजीव अब्दुल्ला आझम मात्र कारवाईच्या कक्षेतून बाहेर राहत थेट आपल्या निवासस्थानी रवाना झाले. दुसरीकडे, ED चे अधिकारी आझम खान यांना अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना गाझियाबाद येथील विशेष PMLA न्यायालयात हजर करणार आहेत, जिथे त्यांच्या कोठडीसाठी (रिमांड) अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – नोव्हेंबरचा पहिला दिवस ठरला महत्त्वाचा! देशभरात लागू झाले नवे नियम, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number