Sunday, June 15, 2025 11:09:39 AM

मोठी कारवाई! चिनी मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या X अकाउंटवर भारतात बंदी

ग्लोबल टाईम्स हे एक चिनी सरकारी माध्यम आहे, जे चिनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचे मानले जाते. ऑपरेशन सिंदूरबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल भारताने चीनच्या ग्लोबल टाईम्सवर टीका केली होती.

मोठी कारवाई चिनी मुखपत्र ग्लोबल टाईम्सच्या x अकाउंटवर भारतात बंदी
China's Global Times X handle blocked in India
Edited Image

नवी दिल्ली: चिनी मुखपत्र 'ग्लोबल टाईम्स'च्या 'एक्स' अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्स हे एक चिनी सरकारी माध्यम आहे, जे चिनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचे मानले जाते. ऑपरेशन सिंदूरबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल भारताने चीनच्या ग्लोबल टाईम्सवर टीका केली होती. यानंतर आता भारताने देशात ग्लोबल टाईम्सवर बंदी घातली आली आहे.

'टीआरटी वर्ल्डचे 'एक्स' अकाउंटवरही भारतात बंदी - 

याशिवाय, तुर्की प्रसारक 'टीआरटी वर्ल्ड' चे 'एक्स' अकाउंट देखील भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.

भारताकडून चिनी माध्यमांवर जोरदार टीका - 

भारताने चिनी माध्यमांवर जोरदार टीका केली होती आणि चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तथ्ये पडताळून पाहावीत आणि स्रोत तपासावेत असे भारताने चिनी माध्यमांना खडसावताना सांगितले होते. पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांवर रात्रीच्या वेळी झालेल्या भारतीय हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने (पीएएफ) आणखी एक भारतीय लढाऊ विमान पाडले असा दावा करणारा अहवाल ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना, बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत हँडलने ट्विटरवरील पोस्टच्या मालिकेत म्हटले आहे की, 'प्रिय @globaltimesnews, आम्ही तुम्हाला सल्ला देतो की अशी चुकीची माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी तुमचे तथ्य पडताळून पहा आणि तुमचे स्रोत तपासा.'

हेही वाचा - चीनचा नवा कुरापतखोर डाव; अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याच्या प्रयत्नांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर

दरम्यान, दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'अनेक पाकिस्तान समर्थक हँडल ऑपरेशन सिंदूरबाबत निराधार दावे पसरवत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा मीडिया आउटलेट्स स्त्रोतांची पडताळणी न करता अशी माहिती शेअर करतात, तेव्हा ते जबाबदारी आणि पत्रकारितेच्या नैतिकतेतील गंभीर त्रुटी दर्शवते.'

हेही वाचा - पाकिस्तानशी मैत्री भोवली! सफरचंदानंतर आता तुर्कीतून येणाऱ्या 'मार्बल'वर बंदी

तत्पूर्वी, भारताने बुधवारी अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या हालचालीला जोरदार नकार दिला आणि हा प्रयत्न हास्यास्पद असल्याचे म्हटले. अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांसाठी चीनी नावांची यादी बीजिंगने जाहीर केल्यानंतर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री