नवी दिल्ली: अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. तथापि, आता एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंग कंपनीला मोठा धक्का बसू शकतो. कारण, केंद्र सरकार बोईंग ड्रीमलायनर 787-8 च्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय आणि अमेरिकन एजन्सी या विषयावर चर्चा करत आहेत. बोईंग ड्रीमलायनर 787-8 च्या उड्डाणांना स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.
वृत्तवाहिनी एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीच्या आधारे, बोईंग 787-8 चे उड्डाण रद्द करण्याबाबत चर्चा सुरू आहे. इतकेच नाही तर एअर इंडिया देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. तथापि, एअर इंडियाकडून विमानांची देखभाल आणि त्याच्या ऑपरेशन प्रक्रियेची देखील आता या विमान अपघातानंतर चौकशी होऊ शकते.
हेही वाचा - '1206' होता विजय रुपाणींचा लकी नंबर; अखेर याच तारखेला झाला माजी मंत्र्याचा शेवट
दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव सनत कौल यांनी सांगितले की, डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून सुरक्षा तपासणीसह त्रुटींबद्दल जाणीव करून दिली आहे. या अपघातानंतर एअर इंडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, ते त्यांच्या विमानांची देखभाल कशी करतात?
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी घेतली दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या कुटुंबियांची भेट
तथापि, बोईंगवर बंदी घालण्याची ही पहिलीचं वेळ नाही. यापूर्वी 2013 मध्ये बोईंग 787 च्या लिथियम-आयन बॅटरीला आग लागली होती, त्यानंतर जगभरात या बॅटरीवर 3 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत, जर अहमदाबाद अपघातामागे इंजिन बिघाड सारखी कारणे आढळली तर बोईंग 787-8 च्या उड्डाणांवर बंदी घातली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.