Sunday, July 13, 2025 10:26:54 AM

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये बदल; आता शनिवारीही रजिस्ट्री कार्यालये खुली राहणार

पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री कार्यालय शनिवारी बंद असायचे, परंतु आता या दुरुस्तीनंतर ते दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.

मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये बदल आता शनिवारीही रजिस्ट्री कार्यालये खुली राहणार
Supreme Court
Edited Image

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेने सर्वोच्च न्यायालयानेच हा बदल केला आहे. या दुरुस्तीनंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री आणि कार्यालय शनिवारीही खुले राहतील. पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री कार्यालय शनिवारी बंद असायचे, परंतु आता या दुरुस्तीनंतर ते दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीसही जारी केली आहे. 

हेही वाचा - भारतात 2 टप्प्यात होणार जनगणना! सरकारने जारी केली अधिसूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांमध्ये मोठा बदल - 

सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये महत्त्वाची दुरुस्ती नमूद करण्यात आली आहे. सूचनेनुसार, संविधानाच्या कलम 145 अंतर्गत, सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालय नियम 2013 च्या आदेश 2 च्या नियम 1, 2 आणि 3 मध्ये राष्ट्रपतींच्या मान्यतेने सुधारणा केली आहे. या दुरुस्तीनंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री आणि कार्यालय दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उघडे राहील. हा नियम 14 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. 

हेही वाचा - विजय रुपाणींच्या निधनाबद्दल गुजरातमध्ये एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर

14 जुलै 2025 पासून लागू होणार नियम -  

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीची अधिसूचना 14 जून 2025 रोजी भारतीय राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्हाला ती अधिसूचना पहायची असेल, तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट www.sci.gov.in ला भेट देऊ शकता. 
 


सम्बन्धित सामग्री