Bank Strike News: बँक ग्राहकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. बँक संघटनांचा आजपासून होणार तीन दिवसीय देशव्यापी संप रात्री मागे घेण्यात आला. त्यामुळे आता बँक व्यवहार सुरळीतपणे होणार असल्याचे समोर येत आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए (IBA) आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू (UFBU), यांनी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली होती. आजपासून म्हणजे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संप पुकारण्यात आला होता. मात्र, काल रात्री उशीरा बँक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत उद्यापासून होणारा तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नेमका तोडगा निघाला की नाही? याबाबतची अपडेट अजून मिळालेली नाही.
बँक कर्मचाऱ्यांची मागणी काय?
संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आहे. कारण काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारात देखील आठवड्यात पाच दिवस काम चालतं त्यामुळे ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
इतर मागण्या
मिळालेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असं म्हटलं आहे. चर्चेतून प्रश्न सोडवायला हवं असे बँक कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. एलआय योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागं घेतली गेली असल्याचं देखील वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.