Gopichand Hinduja Passes Away: भारतीय वंशाचे ब्रिटिश उद्योगपती आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून, त्यांच्या निधनाने जागतिक व्यावसायिक जगतात शोककळा पसरली आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य रामी रेंजर यांनी मंगळवारी या दु:खद घटनेची अधिकृत घोषणा केली.
रेंजर यांचा श्रद्धांजली संदेश
रेंजर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'जड अंतःकरणाने सांगावे लागते की माझे प्रिय मित्र श्री. जीपी हिंदुजा आपल्यात नाहीत. ते अत्यंत दयाळू, विनम्र आणि निष्ठावंत व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. ते समाजहिताचे खरे समर्थक आणि मार्गदर्शक शक्ती होते.'
हेही वाचा - Bihar Elections 2025 : वादग्रस्त वक्तव्य भोवलं!; ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'या' मंत्र्याच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाकडून FIR दाखल
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'मला त्यांना अनेक वर्षांपासून जाणून घेण्याचा सन्मान मिळाला. त्यांची विनोदबुद्धी, देशप्रेम आणि सेवाभाव अतुलनीय होता. समाज आणि भारतासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे. त्यांना स्वर्गात शांती लाभो. ओम शांती.'
हेही वाचा - Gem Jwellery Policy : 'कस्टम्स अॅक्ट आणि SEZ कायद्यात सुधारणा करा'; 'जेम अँड ज्वेलरी' संघटनेची केंद्राकडे मागणी
हिंदुजा ग्रुपचा वारसा
गोपीचंद हिंदुजा हे हिंदुजा बंधूंपैकी एक असून त्यांनी जागतिक स्तरावर बँकिंग, ऑटोमोबाईल, ऊर्जा, आणि रिअल इस्टेट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये हिंदुजा साम्राज्य उभं केलं. ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांमध्ये हिंदुजा परिवार अग्रस्थानी राहिला आहे.