Sunday, July 13, 2025 09:47:06 AM

पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा! पाकिस्तानच्या 'या' दहशतवादी संघटनेचे सदस्य होते हल्लेखोर

राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहलगामच्या हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना अटक केली. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर हे दोन्ही तरुण पहलगाममधील बटाक्कोट गावातील रहिवासी आहेत.

पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात मोठा खुलासा पाकिस्तानच्या या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते हल्लेखोर
Edited Image

श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात हल्लेखोरांबद्दल मोठा खुलासा झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहलगामच्या हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना अटक केली. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर हे दोन्ही तरुण पहलगाममधील बटाक्कोट गावातील रहिवासी आहेत. दोघेही दहशतवादी संघटनेसाठी काम करतात. एनआयएने दोघांची चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी होते. ते पाकिस्तानातून आले होते. तसेच ते लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.

हेही वाचा - मोठा अपघात टळला! 'Mayday' कॉलनंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग

परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील झोपडीमध्ये जाणूनबुजून 3 सशस्त्र दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. दोघांनीही दहशतवाद्यांना अन्न, पाणी, निवास आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली एनआयएने दोघांनाही अटक केली. दोघांविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा 1967 च्या कलम 19 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमान बुकिंगमध्ये मोठी घट; 15 टक्क्यांनी स्वस्त झाली तिकिटे

पहलगाम दहशतवादी हल्ला - 

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहरातील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मोठे हत्याकांड घडवून आणले होते. सशस्त्र दहशतवाद्यांनी खोऱ्यातील पर्यटकांवर हल्ला केला. 25 पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या हत्याकांडाने संपूर्ण जग हादरले होते. या दहशतवादी हल्ल्याचा थेट संबंध पाकिस्तानशी होता. दहशतवाद्यांनी पीओकेमधून भारतात प्रवेश केला. तसेच मारेकऱ्यांनी पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता. 
 


सम्बन्धित सामग्री