Bihar Assembly Election 2025: भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले असून यंदा निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 11 नोव्हेंबरला होईल. मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 243 सदस्यीय बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघांमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की आयोगाने विशेष सुधारणा मोहिमेद्वारे मतदार याद्या तयार केला आहे. अंतिम मसुदा 30 सप्टेंबर रोजी प्रकाशित झाला आहे. कुमार यांनी सांगितले की, आमचे उद्दिष्ट पारदर्शक, शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे आहे. यासाठी राजकीय पक्ष, मतदार आणि माध्यमांचे सहकार्य आवश्यक आहे.
हेही वाचा - Leh Violence: लेह हिंसाचार प्रकरणात सोनम वांगचुक यांना दिलासा नाही! 14 ऑक्टोबरला होणार पुढील सुनावणी
बिहारमधील मतदारसंख्या आणि आरक्षणाचे प्रमाण
बिहारमधील 243 जागांपैकी 38 जागा अनुसूचित जातींसाठी आणि 2 जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 7.42 कोटी मतदार आहेत. यात 3.92 कोटी पुरुष मतदार, 3.50 कोटी महिला मतदार आणि 1,725 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी 14.01 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. कुमार यांनी पुढे सांगितले की या वेळेस 100 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. तसेच, उमेदवारांची छायाचित्रे रंगीत स्वरूपात दाखवली जाणार आहेत. तसेच ईव्हीएमवरील फॉन्ट आकार वाढवण्यात आला आहे
हेही वाचा - BR Gavai : सरन्यायाधीश गवईंकडून हिंदूंच्या देवतांचा अपमान, कोर्टातच वकिलाचं उग्र आंदोलन; नेमकं काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज 17 ऑक्टोबर रोजी होतील, तर दुसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज 20 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार 23 ऑक्टोबरपर्यंत आपले नामांकन मागे घेऊ शकतात.