Thursday, March 20, 2025 04:44:37 AM

Delhi Election Results 2025: भाजपा आले, आप गेले

केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे.

delhi election results 2025 भाजपा आले आप गेले

दिल्ली : केंद्राची सत्ता तब्बल तीन वेळा मिळवणारा भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता मिळवण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आता विधानसेभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास दूर झाला आहे. भाजपाने प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसमुक्त देश ही घोषणा दिलीय. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने भाजपाने काँग्रेसला पूर्णतः बाजूला करून दिल्लीच्या तख्तावर कमळ प्रस्थापित केलंय भाजपाने दिल्लीत 48 जागांवर विजय मिळवत आपचा सुफडासाफ केला आहे. भाजापाच्या योग्य नियोजनामुळे आणि निवडणूक रणनितीमुळे भाजपाने विजयश्री खेचून आणली आहे. भाजपाच्या विजयाचे प्रमुख मुद्दे जाणून घ्या.  

 दिल्लीच्या विजयाचे मुद्दे 

27 वर्षे सत्तापासून दूर राहिल्याने यावेळी भाजपाने विजयाचा दृढ निश्चय केला होता. भाजपाच्या धुरिणांनी अन्य निवडणुकांप्रमाणेच अत्यंत सूक्ष्म नियोजन केले होते. दिल्लीत देशातील सर्वधर्मीय आणि सर्व राज्यातील लोक राहात असल्याने त्याप्रमाणे नियोजन केले होते. दिल्लीतील प्रचारासाठी सर्व राज्यातील प्रमुख नेत्यांना जबाबदारीचे वाटप केले होते. पन्नाप्रमुखापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनीच मतदारांशी थेट संवाद साधला. केंद्र आणि राज्यात एकच पक्ष असल्यास विकासाची गती वाढते हा मुख्य अजेंडा ठेवला. मागील काही वर्षातील सत्ताधारी पक्षांच्या चुकांचा पाढा मतदारांच्या गळी उतरवला. त्यासाठी स्थानिक बैठका, पदयात्रा, चौक सभा, जाहीर सभा अशी प्रचाराची रणनिती ठरवली. केजरीवाल आणि आपच्या नेत्यांवर पद्धतशीरपणे हल्ले चढवण्याचे मुद्दे ठरवले. साध्या राहणीचा प्रचार करणाऱ्या केजरीवाल यांच्या शाही शिशमहलची कहाणी सर्वांसमोर आणली. आपच्या ज्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने सुरू ठेवण्याचे आश्वासन मतदारांना दिले. आपच्या नेत्यांनी सत्तेत असताना केलेल्या चुका प्रभावीपणे मतदारांसमोर मांडल्या. वरिष्ठांनी जी जबाबदारी दिली ती भाजपाच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीनिशी पार पाडली. भाजपाच्या योग्य आणि सूक्ष्म नियोजनामुळे भाजपाचा विजय निश्चित झाला

हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजपाची मुसंडी
 

भाजपाने दिल्लीच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच दि्ल्लीकरांना खूश करण्यासाठी अनेक योजनांचे आश्वासन दिलं होतं.

भाजपाने दिल्लीकरांना दिलेली आश्वासने?

महिलांना महिन्याला 2500 रुपये मिळणार 
गर्भवती महिलांना 21 हजार रुपये मिळणार
बसमध्ये मोफत प्रवास
वृद्धांना 2500 रुपये दरमहा पेन्शन मिळणार
गरीबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी मिळणार
होळी आणि दिवाळीला 1-1 सिलेंडर मोफत मिळणार
200 युनिटपर्यंत वीज मोफत
महिन्याला 20 हजार लीटर पाणी मोफत
आयुष्यमान योजनेसह एकूण 10 लाखांचं हेल्थ कव्हर

दिल्लीच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानत सुशासनाचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

जनशक्ती सर्वोपरि! 

विकासाचा विजय होतो, सुशासनाचा विजय होतो. भाजपला मिळालेल्या या उत्तुंग आणि ऐतिहासिक जनादेशासाठी दिल्लीतील बांधवांना नमन केले आहे. हे आशीर्वाद मिळाल्याबद्दल आम्ही नम्र आणि सन्मानित झालोय. दिल्लीचा विकास करण्याची आमची हमी आहे. लोकांचे एकूण जीवनमान सुधारणार आहे. विकसित भारतात दिल्लीची प्रमुख भूमिका आहे हे सुनिश्चित करणार आहे. 


हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीतील विजयानंतर मुंबईत भाजपाचं जोरदार सेलिब्रेशन
 

भाजपाला त्यांच्या विकासाच्या ध्येयावर विजय मिळाल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं आहे.भाजपाच्या रणनितीकार चाणक्यांनी नियोजनपद्धतीनं दिल्ली निवडणुकीत विजय स्वतःकडे खेचून आणला. केंद्रात सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला दिल्लीची सत्ता दूर असल्यामुळे राजकीय पटलावर हिणवले जायचे. भाजपाने आता दिल्लीचे तख्त काबीज केले असून आगामी निवडणुकीसाठी भाजपाच्या विजयाचा विश्वास अधिक बळावलं आहे. 


सम्बन्धित सामग्री