‘लवकर लग्न करा आणि 5 मुलांना जन्म द्या’; भाजप खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी हिंदू तरुण-तरुणींना केलेल्या आवाहनाची चर्चा

अशा प्रकारचा सामाजिक समतोल राखण्यासाठी केवळ राजकीय पक्षांवर अवलंबून न राहता समाजाने स्वतःची ताकद ओळखली पाहिजे, असे गजेंद्र सिंह पटेल यांनी सांगितले.

‘लवकर लग्न करा आणि 5 मुलांना जन्म द्या’; भाजप खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी हिंदू तरुण-तरुणींना केलेल्या आवाहनाची चर्चा
Gajendra Singh Patel

5 Children Advice by BJP MP for Hindu Population Growth: मध्य प्रदेशातील बडवानी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पार्टीचे (BJP) खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी हिंदू युवकांना लवकर विवाह बंधनात अडकण्याचा आणि कमीत कमी 5 ते 6 मुलांना जन्माला घालण्याचा अजब सल्ला दिला आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय समीकरणांवर चिंता व्यक्त करताना त्यांनी पूर्वीच्या पिढ्यांची उदाहरणे दिली. पूर्वीच्या काळी लोक 20, 21 किंवा 22 वर्षांच्या वयात लग्न करून 4 ते 7 मुलांना जन्म द्यायचे; परंतु आजकाल लोक 30 ते 37 वर्षांचे होईपर्यंत लग्नासाठी थांबतात आणि केवळ एकाच अपत्याला जन्म देण्यास प्राधान्य देतात. विवाहाच्या या वाढत्या वयामुळे आणि छोट्या कुटुंबपद्धतीमुळे सनातनी समाजातील जन्मदर घसरून 1.9 वर आला असून ही परिस्थिती बदलण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यानंतरच्या लोकसंख्या आलेखावर खासदार पटेल यांचे भाष्य
अशा प्रकारचा सामाजिक समतोल राखण्यासाठी केवळ राजकीय पक्षांवर अवलंबून न राहता समाजाने स्वतःची ताकद ओळखली पाहिजे, असे गजेंद्र सिंह पटेल यांनी सांगितले. कठीण प्रसंगांत सनातनी समाजच एकमेकांच्या पाठीशी उभा राहील; त्यासाठी काँग्रेस किंवा भाजपवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. 1947 आणि 1967 मधील सामाजिक परिस्थितीचा दाखला देत त्यांनी नमूद केले की, स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः 2011च्या जनगणनेनंतर एका विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वेगाने वाढली आहे, तर दुसऱ्या बाजूला सनातनी समुदायाचा लोकसंख्येचा आलेख खालावला आहे. हा घटता आलेख रोखण्यासाठीच त्यांनी तरुण पिढीला कुटुंब विस्तार भरभराटीने करण्याचा सल्ला दिला.

हेही वाचा – माजी CBI अधिकारी थेट मोदींच्या विरोधात मैदानात! देशाच्या राजकारणात नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री

भक्तीसोबत शक्ती अन् शस्त्रांची गरज; जिम व अखाड्यांना प्रोत्साहन
लोकसंख्येच्या मुद्द्याव्यतिरिक्त खासदार पटेल यांनी समाजाच्या शारीरिक आणि आध्यात्मिक मजबुतीवरही विशेष भर दिला. केवळ भक्ती करून चालणार नाही, तर तरुणांकडे शारीरिक ताकद आणि गरज पडल्यास स्वसंरक्षणासाठी शस्त्रेही असली पाहिजेत, असा विचार त्यांनी मांडला. यासाठी गावागावांत पारंपरिक कुस्तीचे अखाडे आणि आधुनिक जिम संस्कृतीला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तरुणांनी दाखुलबाजीच्या संस्कृतीपासून दूर राहून स्वतःचे आरोग्य आणि शक्ती कमावण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तरुणांमधील व्यसनाधीनता आणि डीजेच्या धुंदीवर तीव्र चिंता
यावेळी बोलताना त्यांनी समाजासमोरील डीजे, ड्रग्ज आणि हुंडाबळी यांसारख्या गंभीर समस्यांवरही भाष्य केले. आजकाल सणांमधील डीजेच्या तालावर नाचणारे जवळपास 100 टक्के तरुण हे सनातन धर्माचेच आहेत, परंतु दुर्दैवाने त्यातील जवळपास 60 टक्के तरुण हे कोणत्याही ना कोणत्याही नशेच्या अमलाखाली नाचत असतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हा अमली पदार्थांचा विळखा आणि डीजेची धुंदी तरुणाईला उद्ध्वस्त करत असून, समाजाने या धोक्यांची वेळीच गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असा इशारा देत पटेल यांनी समाज मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पक्ष थेट ‘INDIA’ आघाडीत दाखल

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number