Monday, February 10, 2025 06:05:57 PM

bjp mp hema malini on 30 died in mahakumbh stamped
'ती काही फार मोठी घटना नव्हती', भाजप खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर वक्तव्य; 30 जणांचा झाला मृत्यू

काय होती घटना : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. हजारो लोक बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

ती काही फार मोठी घटना नव्हती भाजप खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर वक्तव्य 30 जणांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली : अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेविषयी विचारले असता 'ती काही इतकी मोठी घटना नव्हती' असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार हेमा मालिनी यांनी केले आहे.
महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी ही काही इतकी मोठी घटना नव्हती. मला माहिती नाही नेमके काय घडले होते. मात्र, याची अतिशयोक्ती केली जात आहे, असे वादग्रस्त विधान हेमा मालिनी यांनी केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना, हेमा मालिनी म्हणाल्या की, उत्तर प्रदेश सरकार इतक्या भव्य महाकुंभमेळ्याचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे. इथे लष्कर बोलावण्याची गरज आहे का, असे विचारले असता अशी गरज नसल्याचे त्या म्हणाल्या.
महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. तसेच, हजारो लोक बेपत्ता असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेकांनी या चेंगराचेंगरीनंतर आपले नातेवाईक सापडत नसल्याचे म्हटले आहे.

“ही काही इतकी मोठी घटना नव्हती”
“आम्ही महाकुंभमेळ्याला गेलो होतो, आम्ही खूप छान पद्धतीने स्नान केले. चेंगराचेंगरीची घटना घडली हे खरे आहे. पण ती फार मोठी घटना नव्हती. ती किती मोठी होती हे मला माहीत नाही. त्याची आता अतिशयोक्ती केली जात आहे. इतके लोक येत आहेत, त्यांचे व्यवस्थापन करणे खूप कठीण आहे परंतु आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत,” असे भाजप खासदार हेमा मालिनी यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी

मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले होते. मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर सरकारच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा - नवजात बाळाच्या पोटातून 2 मृत अर्भक काढले; पुढे काय झालं?

विरोधी पक्ष आक्रमक

समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनीही 15 हजार लोकांनी आपले नातेवाईक हरवल्याच्या तक्रारी दिल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 1954 साली कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत त्या घटनेची पूर्ण माहिती दिली होती. त्या वेळच्या घटनेत किती लोक मारले गेले आणि किती जखमी झाले, याचा आकडा त्यांनी दिला होता. 

'1954 मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी 400 लोक मारले गेल्याचे आणि 2 हजार लोक जखमी झाल्याचे सांगितले. तसेच, या ठिकाणी अनेक प्रसिध्द लोक कोणत्याही पत्राशिवाय, जाहिरातीशिवाय आणि पूर्वसूचनेशिवाय येत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी सेलिब्रिटीजना पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळू शकते, हे जाणून लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्हीआयपी लोकांना तेथे जाण्यास मनाई केली होती.'
 

हेही वाचा - Raw Garlic Benefits : कच्चा लसूण खाणं ठरेल संजीवनी, दररोज खाल्ल्याने 'या' समस्या होतील दूर

अखिलेश यादव लोकसभेत आक्रमक
आज सकाळीच, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या पारदर्शकपणे समोर मांडावी अशी मागणी केली आहे. सरकारने मृतांची संख्या, जखमींवर उपचार आणि कार्यक्रमासाठी केलेल्या व्यवस्थेची अचूक आकडेवारी सादर करावी अशी विनंती केली आहे.

'महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थेबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि तेथील जबाबदारी लष्कराकडे सोपवली पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार अर्थसंकल्पातील आकडेवारी देत​आहे, त्याचप्रमाणे महाकुंभमेळ्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे, जखमींच्या उपचारांचे आणि अन्न व वाहतूक इत्यादींचे आकडेही संसदेत सादर करावेत,' असे अखिलेश यादव मंगळवारी लोकसभेत बोलताना म्हणाले.