दुःखद बातमी! ‘CID’ चे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन; कलाविश्वात शोककळा

हिंदी मालिकाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे

दुःखद बातमी! ‘CID’ चे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंह यांचे वयाच्या 77व्या वर्षी निधन; कलाविश्वात शोककळा

हिंदी मालिकाविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. क्राईम मालिकांमधील सर्वांत गाजलेली मालिका म्हणजे CID, याचे दिग्दर्शक-निर्माते बी. पी. सिंह यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने हा अकाली मृत्यू ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सलग 19 वर्षांहून अधिक काळ चालणारी CID ही भारतीय टेलिव्हिजनमधील सर्वात जास्त काळ चाललेल्या मालिकांपैकी एक आहे. त्यांनी याबरोबरच आहट, SuperCops Vs Super Villains सारख्या गाजलेल्या मालिकांची निर्मिती केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते आणि ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ (IFTDA) चे पदाधिकारी अशोक पंडित यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.अशोक पंडित यांनी पोस्टमध्ये लिहिले, “Ace producer-director B. P. Singh यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. आज सकाळी हृदयविकाराच्या मोठ्या झटक्याने त्यांचे निधन झाले. CID आणि Aahat सारख्या मालिकांनी देशाला भुरळ घालणारे एक brilliant filmmaker. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.”

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number