ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल; अर्णब चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकले, महाराष्ट्रात पावसाची शक्यता?

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अर्णब चक्रीवादळ आज 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या चक्रीवादळामुळे देशभरात पावसाचे वातावरण सक्रिय झाले असून, त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे.

देशात कमाल-किमान तापमान कुठे व किती?

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे राहिले असून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरातसह कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. यावेळी राजकोट येथे 39.3 अंश सेल्सिअससह सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली, तर नाशिकमध्ये 14.3 अंश सेल्सिअससह सर्वात कमी किमान तापमान होते.

राज्यात सध्या वाऱ्याचा वेग वाढला असून साताऱ्यातील कराड येथे 54 किमी प्रतितास, लातूरच्या नांदूर येथे 50 किमी आणि रायगडच्या माणगाव येथे 37 किमी वेगाने वारे वाहिल्याची नोंद आहे.

उद्यापासून पावसाला सुरुवात?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 28 ऑक्टोबरपासून हवामानात बदल होणार आहे. दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात मात्र मुख्यत्वे निरभ्र हवामान राहील. तर 29 ऑक्टोबर रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा असून, काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – स्वेटर-शाल बाहेर काढा! ऑक्टोबर हिटनंतर मुंबईकरांना थंडीचा दिलासा; राज्यात हवामान बदलणार?

मुंबईकरांसाठी अंदाज

मुंबई शहर आणि परिसरात पुढील 24 तासात सकाळच्या वेळी धुके आणि दुपार-संध्याकाळी अंशतः ढगाळ आकाश राहील. कमाल 35 आणि किमान 24 अंश तापमान राहील. पुढील 48 तासात मुंबईत संध्याकाळी/रात्री हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. तापमान 33 आणि 23 अंशांपर्यंत खाली येईल.

अरबी समुद्रावरील हवामान

सध्या मोसमी असल्याचे विभागाने म्हटले आहे.अर्णब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. मेघगर्जना सुरू असताना मोकळ्या शेतात काम करणे टाळावे, झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ आश्रय घेऊ नये. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि काढलेले धान्य पावसापासून वाचवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number