रत्नागिरी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत अखेर चिपळूणचा समावेश झाला आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी ट्रिगर वनमध्ये तीन, तर ट्रिगर टूमध्ये तीन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले होते. मात्र, चिपळूण, दापोली आणि गुहागर या तालुक्यांचा त्यात समावेश नव्हता. आमदार शेखर निकम यांच्या मागणीनंतर अखेर चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील नऊपैकी सात तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघ असलेल्या गुहागरसह दापोली तालुका अद्यापही दुष्काळग्रस्त यादीबाहेर आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर