नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला, तरुण, आणि ज्येष्ठांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, सोने आणि चांदीसाठी कोणत्याही विशेष घोषणा करण्यात आल्या नाहीत. तरीही बजेट सादर होत असतानाच बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
सोन्याच्या किमतीत मोठी वाढ
बजेटच्या दिवशीच दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,900 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत ही सर्वाधिक वाढ असून, सोन्याच्या दरात तब्बल 1,100 रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सालाच्या सुरुवातीला हा दर 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजेच आतापर्यंत 5,510 रुपयांची वाढ झाली आहे!
22 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही वाढ
22 कॅरेट सोन्याची किंमत देखील वाढली असून, ती प्रति 10 ग्रॅम 85,500 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय चांदीच्या दरातही वाढ झाली असून 1 किलो चांदीचा दर 850 रुपयांनी वाढून 95,000 रुपये झाला आहे.
Budget 2025 : कर्करोगाची औषधे स्वस्त होणार, 10 हजार वैद्यकीय जागा वाढणार
महाराष्ट्रात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात तेजी दिसून येत असून सोन्याने उच्चांकी दराची उसळी घेतली आहे.महाराष्ट्रातसोन्याचे प्रती तोळ्याचे दर 81 हजार 700 रुपये तर जीएसटीसह सोने 84 हजार 330 रुपयांवर पोहोचले आहे.सोन्याचे दर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात दुसऱ्यांदा वाढले आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकेची व्याजदरात कपात अशा गोष्टींमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
सोन्याचे वाढते दर प्रति 10 ग्रॅम
सोन्याचा शुक्रवारचा दर - 84,330 रुपये (24कॅरेट)
2010 साली 10 ग्रॅम सोन्याचा दर 16,350 रुपये
2011 मध्ये सोन्याचा भाव 27,500 रुपये
2012 मध्ये सोन्याचा भाव 30,900 रुपये
2015 मध्ये सोन्याचा भाव 26 हजार रुपये
2016 मध्ये सोन्याचा भाव 31,570 रुपये
2019 सालापर्यंत सोन्याचा भाव 35 हजार रुपये
2020 मध्ये सोन्याचा भाव 50,000 हजार रुपये
2024 मध्ये सोन्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली
सोन्याची किंमत 72,030 हजार रुपये झाली
त्यानंतर सातत्याने सोन्यांच्या दरात वाढ होत आहे
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सोने आणखी महागणार?
बजेटनंतर सोन्याचा दारात वाढ झालेली पाहता, येत्या काळातही किंमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी हे दर महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजाराच्या हालचालींवर लक्ष ठेवा!