Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी उसळी; जाणून घ्या 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

सण-उत्सव आणि लग्नसराईचा काळ जवळ येत असल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीतील या चढ-उताराचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होत आहे.
gold
gold

Gold Price on 2 October 2026 : आगामी काळात जर तुम्ही सोने अथवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सराफा बाजार उघडताच आज, 2 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,923 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13,679 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 11,192 रुपये पातळीवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र स्थिरता पाहायला मिळत असून चांदीचा भाव प्रति ग्रॅम 234.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,34,900 रुपये नोंदवला गेला आहे.

प्रमुख शहरांमधील सोन्याचे 10 ग्रॅमचे ताजे दर
देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतींमध्ये थोडा फरक पाहायला मिळत आहे. प्रमुख शहरांमधील 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई, पुणे, नागपूर, बंगळुरु, हैद्राबाद आणि कोलकाता: या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,36,790 रुपये, 24 कॅरेटचा दर 1,49,230 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 1,11,920 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
दिल्ली: राजधानी दिल्लीत 22 कॅरेटसाठी 1,36,940 रुपये, 24 कॅरेटसाठी 1,49,400 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,12,070 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.
नाशिक: नाशिकमध्ये 22 कॅरेटचा भाव 1,36,820 रुपये, 24 कॅरेटचा भाव 1,49,260 रुपये तर 18 कॅरेटचा भाव 1,11,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई: चेन्नई शहरात 22 कॅरेटसाठी 1,36,790 रुपये, 24 कॅरेटसाठी 1,49,230 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 1,12,390 रुपये प्रति 10 ग्रॅम दर नोंदवला गेला आहे.

हेही वाचा – दिवाळी-दसऱ्यापूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; साखरेची साठवणूक मर्यादा निश्चित, दरातही ‘इतक्या’ टक्क्यांची घट

चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी दराचा आढावा घेणे आवश्यक
सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना चांदीने मात्र ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. सण-उत्सव आणि लग्नसराईचा काळ जवळ येत असल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीतील या चढ-उताराचा थेट परिणाम ग्राहकांच्या बजेटवर होत आहे. त्यामुळे सराफा दुकानात पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर पडताळून पाहणे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल.

हेही वाचा – सणासुदीत रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! पुणे विभागातून 216 स्पेशल ट्रेन ; कधी अन् कोणत्या मार्गावर धावणार?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version