ग्राहकांना दिलासा! पितृपक्षात सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या, मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे आजचे दर

सणासुदीचा काळ तोंडावर असताना सोन्याच्या भावात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे.
gold silver
gold silver

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच आज 06 ऑक्टोबर 2026 रोजी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पितृपक्षाच्या काळात सोन्याच्या किमतीत घट झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 160 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांची आणि 18 कॅरेट सोन्याच्या भावात 120 रुपयांची घसरण झाली आहे. मात्र, सोन्याच्या तुलनेत चांदीचे भाव स्थिर राहिले असून 1 ग्रॅम चांदीचा दर 235 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 2,35,000 रुपये नोंदवण्यात आली आहे.

मुंबई आणि पुण्यात 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचा दर
गुडरिटर्न्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मुंबई आणि पुण्यात सोन्याचे आजचे दर असे आहेत –
24 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्रॅम सोन्याचा भाव 14,902 रुपये, 8 ग्रॅमचा दर 1,19,216 रुपये आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,49,020 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्रॅम सोन्याचा भाव 13,660 रुपये, 8 ग्रॅमचा दर 1,09,280 रुपये आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,36,600 रुपये नोंदवली गेली आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर: 1 ग्रॅम सोन्याचा भाव 11,177 रुपये, 8 ग्रॅमचा दर 86,416 रुपये आणि 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,11,770 रुपये इतकी आहे.

हेही वाचा – आता लग्नासाठी मिळणार 8 ग्रॅम सोनं अन् रेशमी साडी; राज्य सरकारची मोठी घोषणा, कोण ठरणार पात्र?

काही प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव
देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरात किरकोळ फरक पाहायला मिळत आहे:
नाशिक: 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,905 रुपये, 22 कॅरेटसाठी 13,663 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 11,191 रुपये आहे.
नागपूर: 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 14,902 रुपये, 22 कॅरेटसाठी 13,660 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11,177 रुपये इतका आहे.
दिल्ली: 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 14,917 रुपये, 22 कॅरेटसाठी 13,675 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11,192 रुपये आहे.
चेन्नई: 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 14,902 रुपये, 22 कॅरेटसाठी 13,660 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 11,220 रुपये आहे.

पुढील दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरणीची शक्यता
सणासुदीचा काळ तोंडावर असताना सोन्याच्या भावात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे. सराफा बाजारातील विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी काही प्रमाणावर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version