Ladki Bahin Yojana September Installment Payment Date: महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा मोठ्या चर्चेत आली आहे. आज 06 ऑक्टोबर 2026 चा दिवस उजाडला तरी पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. यामुळे राज्यातील लाखो भगिनी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होऊन हप्ता वितरणाची अधिकृत तारीख निश्चित केली जाण्याची दाट शक्यता आहे.
नवरात्री अन् दसऱ्याच्या मुहूर्तावर थेट बँक खात्यात मिळणार मदत
राज्य सरकारने यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्तेदेखील विविध सण-उत्सवांचे औचित्य साधूनच भगिनींच्या खात्यावर वितरित केले होते. सध्या राज्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून लवकरच दसऱ्याचा सण येत आहे. या सणासुदीच्या काळात महिलांना दिलासा देण्यासाठी सरकार 25 ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने हप्त्याची रक्कम थेट खात्यात पाठवण्याची तयारी करत आहे. थेट बँक हस्तांतरण म्हणजेच ‘डीबीटी’ (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीचा वापर करून ही रक्कम पारदर्शकपणे हस्तांतरित केली जाणार आहे.
हेही वाचा – ऑक्टोबर हिटमध्ये पावसाची एन्ट्री! बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या; महाराष्ट्रात हवापालट होणार
राज्यातील 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार थेट लाभ
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 1 कोटी 66 लाख पात्र लाडक्या बहिणींना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. दुष्काळ परिस्थितीच्या आढाव्यासह राज्य सरकार महिलांच्या या आर्थिक मदतीला प्राधान्य देत असून सणांच्या तोंडावर ही रक्कम महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. पात्र महिलांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग आणि डीबीटी स्टेटस सक्रिय असणे या वितरणासाठी अत्यंत आवश्यक मानले जात आहे.
टप्प्याटप्प्याने होणार 1500 रुपयांचे वितरण
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळताच प्रशासनाकडून निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू केली जाईल. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणारे हे वितरण काही दिवसांत सर्व 1 कोटी 66 लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच नवरात्री आणि दसऱ्याची मोठी भेट मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा – “जिथे चांगला रिझल्ट येतो, तिथेच मी जातो” संजय शिरसाटांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा; नेमकं काय म्हणाले?