“जिथे चांगला रिझल्ट येतो, तिथेच मी जातो” संजय शिरसाटांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा; नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या महायुती प्रचारसभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

“जिथे चांगला रिझल्ट येतो, तिथेच मी जातो” संजय शिरसाटांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat

सध्या राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. असं असताना छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या महायुती प्रचारसभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सतीश चव्हाण यांच्या प्रचारसभेतील वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे.

हेही वाचा- ‘2022 मध्ये बंड केलं म्हणूनच आज मंत्री झालो…;’ संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

“मी तिथेच जातो, जिथे चांगला रिझल्ट येतो; जिथे रिझल्ट येत नाही, तिथे मी जात नाही,” असं वक्तव्य शिरसाट यांनी केले. इतकंच नाही तर दुकानाचे उद्घाटनही कोणते दुकान चालेल हे पाहून करतो, असे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टोला लगावला. “संजय राऊत यांना जो उमेदवार घेऊन गेला, अशी निवडून आलेली जागा दाखवा,” असेही ते म्हणाले. पुढे मी ज्या ठिकाणी जातो, तिथून उमेदवार निवडून येतो, त्यामुळे चिंता करू नका आणि कार्यकर्त्याला खुश ठेवा, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी यावेळी दिला.

तसेच प्रचाराला अठरा दिवस असताना सतीश चव्हाण इतक्या तालुक्यातील मतदारांपर्यंत कसे पोहचत असतील? खरचं त्यांना मानावं लागेल, अशा शब्दात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या विजय संकल्प सभेत टोलेबाजी केली. मला आयुष्यात कधी संधी मिळाली तरी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार नाही, असे शिरसाट म्हणाले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number