ऑक्टोबर हिटमध्ये पावसाची एन्ट्री! बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या; महाराष्ट्रात हवापालट होणार

राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असून उन्हाचा तडाखा राज्यातील अनेक भागांमध्ये जाणवत आहे. अशातच ऑक्टोबर हिट असताना वातावरणात मोठा उलटफेरा पाहायला मिळत आहे.

ऑक्टोबर हिटमध्ये पावसाची एन्ट्री! बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या; महाराष्ट्रात हवापालट होणार
Weather Update

राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असून उन्हाचा तडाखा राज्यातील अनेक भागांमध्ये जाणवत आहे. अशातच ऑक्टोबर हिट असताना वातावरणात मोठा उलटफेरा पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने 6 ऑक्टोबरला राज्यात पावसाचा मोठा इशारा दिला. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

सध्या पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवत आहेत. मध्य महाराष्ट्रात हवापालट होणार आहे तसेच काही भागातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा- मोठी विमान दुर्घटना! कंट्रोल रुमसोबत संपर्क तुटला अन् काही क्षणात विमान कोसळलं; 32 जणांचा मृत्यू

आज मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.

तर पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागाता पाऊस होणार नाही.
त्याचसोबत नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर कमी होईल. तसेच कोल्हापूर आणि सातारा घाटमाथावर विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि राज्यातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number