Shirdi Defense Hub: साईनगरीत आता तोफा धडाडणार; शिर्डीत साकारले देशाचे नवे डिफेन्स हब; 17 कोटींच्या प्रकल्पाने अहिल्यानगरचा कायापालट

'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अभियानाला बळ देत, शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा संरक्षण साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Shirdi Defense Hub: साईनगरीत आता तोफा धडाडणार; शिर्डीत साकारले देशाचे नवे डिफेन्स हब; 17 कोटींच्या प्रकल्पाने अहिल्यानगरचा कायापालट

Shirdi Defense Hub: जगप्रसिद्ध आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता भारताच्या लष्करी सामर्थ्याचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाला बळ देत, शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा संरक्षण साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे आता साईनगरीच्या मातीत भारतीय लष्करासाठी रॉकेट लाँचर आणि बॉम्बची निर्मिती होणार आहे.

वर्षाला 5 लाख बॉम्ब शेल्स; जागतिक बाजारपेठेत शिर्डीचा डंका
‘निबे ग्रुप’ने 200 एकर परिसरात हा महाप्रकल्प अवघ्या 1 वर्षात उभा केला आहे. या कारखान्याची वार्षिक क्षमता 5 लाख बॉम्ब शेल्स बनवण्याची असून, भारतीय लष्कराची गरज भागवून येथून परदेशातही निर्यात केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अनेक देशांनी या उत्पादनांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगही केले आहे.

23 मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा
या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण 23 मे रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) जनरल अनिल चौहान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

हेही वाचा – Maharashtra politics: ‘भारतीय युवक मंद…’; संजय राऊतांच्या पोस्टने राजकारण तापलं, भाजपाचा जोरदार पलटवार

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि ‘गेमचेंजर’ प्लॅन:

विक्रमी निर्मिती: केवळ 1 वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण.

रोजगार क्रांती: 23 आणि 24 मे रोजी होणाऱ्या ‘MSME एक्स्पो’मध्ये 300 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून, याद्वारे हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

लष्करी ताकद: क्षेपणास्त्र सामग्री आणि जड शस्त्रसाहित्य निर्मितीवर भर.

गोपनीयता: आंतरराष्ट्रीय करारांमुळे निर्यात होणाऱ्या देशांची नावे सध्या गुप्त ठेवण्यात आली आहेत.

पुणे आणि अहिल्यानगरच्या औद्योगिक पट्ट्यासाठी हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार असून, शिर्डी आता केवळ तीर्थक्षेत्र न राहता देशाच्या सुरक्षेचा अभेद्य गड म्हणून ओळखली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number