दिवाळीपूर्वी केंद्र सरकारची मोठी भेट; कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 63 टक्के; पगारात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत वाढ

8 व्या वेतन आयोगाबाबत देशभरात चर्चा सुरू असतानाच, 7 व्या वेतन आयोगांतर्गत जुलै 2026 साठीचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
DA hike
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित

DA Hike: दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी (pensioners) अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. 8 व्या वेतन आयोगाबाबत देशभरात चर्चा सुरू असतानाच, 7 व्या वेतन आयोगांतर्गत जुलै 2026 साठीचा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. कामगार ब्युरोने (Labour Bureau) जाहीर केलेल्या ‘अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांका’च्या (AICPI-IW) जून 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात तब्बल 3 टक्के वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या निर्णयाला औपचारिक मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.

एकूण महागाई भत्ता 60 टक्के वरून थेट 63 टक्क्यांवर जाणार

सरकार AICPI-IW च्या 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीच्या आधारे वर्षातून दोन वेळा (जानेवारी आणि जुलै) महागाई भत्त्यात सुधारणा करते. जून 2026 साठी CPI-IW निर्देशांक 1.1 अंकांनी वाढून 151.9 वर पोहोचला आहे, जो मे महिन्यात 150.8 होता. जुलै 2025 ते जून 2026 या 12 महिन्यांची सरासरी 148.65 अंक येते. 7 व्या वेतन आयोगाच्या निश्चित सूत्रानुसार आणि 2.88 च्या रूपांतरण घटकाद्वारे केलेली गणना 63.76 टक्के इतकी येते. महागाई भत्ता हा नेहमी पूर्णांकात दिला जात असल्याने तो 63 टक्के निश्चित केला जाईल. यापूर्वी एप्रिल 2026 मध्ये सरकारने 2 टक्के वाढ जाहीर केली होती, ज्यामुळे DA 60 टक्केवर पोहोचला होता. आता त्यात पुन्हा 3 टक्केची भर पडणार आहे.

50.46 लाख कर्मचारी आणि 68.27 लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 50.46 लाख आजी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख निवृत्तीवेतनधारकांना थेट फायदा मिळणार आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठीच्या महागाई सवलतीतही 3% वाढ होणार असून, त्यामुळे त्यांच्या हातात येणाऱ्या पेन्शनची रक्कम वाढणार आहे.

हेही वाचा – मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा! गव्हाच्या MSP मध्ये 25 रुपयांची वाढ; आता प्रति क्विंटलला मिळणार ‘इतका’ दर

जुलैपासूनची थकबाकी एकत्र मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळ दिवाळीच्या सुमारास, म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2026 मध्ये या निर्णयाला अंतिम मंजुरी देईल. ही वाढ 1 जुलै 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार असल्याने, जुलै ते मंजुरीच्या महिन्यापर्यंतची सर्व थकबाकी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एकाच टप्प्यात दिली जाणार आहे. 8 व्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत, सध्याच्या 7 व्या वेतन आयोगाच्या आराखड्यानुसारच DA आणि DR मध्ये दर सहा महिन्यांनी नियमित सुधारणा सुरू राहील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version