‘अंतर्गत फूट?’ कॉकरोच जनता पार्टीतील वादाच्या चर्चांवर संस्थापक अभिजीत दिपके यांचे मजेशीर प्रत्युत्तर

सीजेपीमध्ये पक्षांतर्गत फूट पडली असून या तीनही नेत्यांमधील मैत्री आणि घट्ट बॉडिंग आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, अशा प्रकारच्या चर्चांना समाज माध्यमांवर उधाण आले होते.

‘अंतर्गत फूट?’ कॉकरोच जनता पार्टीतील वादाच्या चर्चांवर संस्थापक अभिजीत दिपके यांचे मजेशीर प्रत्युत्तर
CJP

CJP Abhijeet Dipke Social Media Viral Post on Internal Rift: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक आणि संयोजक अभिजीत दिपके यांच्याबाबत सोशल मीडियावर एक महत्त्वाची बातमी जोरदार व्हायरल होत आहे. जंतरमंतरवरील एका आंदोलनानंतर सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांना काही दिवस तिहार तुरुंगामध्ये काढावे लागले होते, तर अभिजीत दिपके यांचा तुरुंगवास टळला होता. या सर्व वादानंतर पक्षांतर्गत फूट पडली असून या तीनही नेत्यांमधील मैत्री आणि घट्ट बॉडिंग आता पूर्वीसारखे राहिलेले नाही, अशा प्रकारच्या चर्चांना समाज माध्यमांवर उधाण आले होते. मात्र, तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांनी एकत्र येत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

अभिजीत दिपके यांचे सोशल मीडियावर भन्नाट प्रत्युत्तर; उपरोधिक टोला
पक्षांतर्गत वाद आणि मतभेदांमुळे पक्षात फूट पडल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया युझर्सना आणि विरोधकांना अभिजीत दिपके यांनी अत्यंत मजेशीर आणि हटके अंदाजात चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक्स (ट्विटर) वर एक खास फोटो शेअर करत त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या व्हायरल फोटोमध्ये अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका हे तिघेही एकाच पद्धतीचे काळ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे, दिपके स्वतः गंमतशीर चेहऱ्याने सेल्फी काढत आहेत, तर आशुतोष रांका आणि सौरव दास त्यांना मजेशीर पद्धतीने बुक्का मारण्याच्या अविर्भावात उभे असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – टायगर श्रॉफनंतर आता प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर गोळीबार; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर, ‘या’ व्यक्तीवर संशय व्यक्त

‘पक्षांतर्गत फूट’ असे उपरोधिक कॅप्शन देत विरोधकांची बोलती बंद
या भन्नाट फोटोला अभिजीत दिपके यांनी ‘पक्षांतर्गत फूट’ (Internal Rift) असे अत्यंत उपरोधिक आणि मजेशीर कॅप्शन दिले आहे, ज्यावरून पक्षाची प्रतिमा मलिन करू पाहणाऱ्यांना त्यांनी थेट निशाण्यावर घेतले आहे. आंदोलनाचा निर्णय आणि तिहार तुरुंगवासावरून त्यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या ज्या वावड्या उठल्या होत्या, त्याला या फोटोने सडेतोड उत्तर दिले आहे. पक्षातील वरिष्ठांवर टीका करणाऱ्यांना तिन्ही नेत्यांनी आपल्या दिलखुलास मैत्रीच्या जोरावर एकत्र येऊन सविस्तर आणि अचूक संदेश दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांची तिहारमधून सुटका
दरम्यान, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, ज्यामुळे दोन्ही नेते तिहार तुरुंगातून बाहेर सुखरूप परतले. तुरुंगातून बाहेर आल्यावर लगेचच या तिन्ही नेत्यांनी एकत्र येत काढलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरला असून, सीजेपीच्या गोटात सर्व काही सुरळीत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! कमी खर्चात लाखोंचं विमा संरक्षण; काय आहेत अटी?

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number