Ahmedabad Plane Crash: ‘त्या तांत्रिक त्रुटींची स्वतंत्र तपासणी करा…’; अहमदाबाद विमान अपघाताबाबत पायलट संघटनेचे PMO अन् DGCA ला पत्र

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, 'फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स' (FIP) ने 'AAIB' कडे बोइंग-787 विमानाची सर्वसमावेशक सिम्युलेटर चाचणी घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

Ahmedabad Plane Crash: ‘त्या तांत्रिक त्रुटींची स्वतंत्र तपासणी करा…’; अहमदाबाद विमान अपघाताबाबत पायलट संघटनेचे PMO अन् DGCA ला पत्र

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, 'फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स' (FIP) ने 'AAIB' कडे बोइंग-787 विमानाची सर्वसमावेशक सिम्युलेटर चाचणी घेण्याची आग्रही मागणी केली आहे. या महत्त्वपूर्ण चाचण्यांदरम्यान निष्पक्षता राखण्यासाठी FIP च्या एका पर्यवेक्षकाला (Observer) प्रक्रियेत सामील करून घेण्यात यावे, असे संघटनेने म्हटले आहे. याशिवाय, 'RAT' ची तैनाती, हायड्रोलिक पॉवरची उपलब्धता आणि फ्यूल कंट्रोल स्विचची कार्यपद्धती यांच्यातील तांत्रिक संबंधांची स्वतंत्रपणे चौकशी होणे गरजेचे असल्याचे पायलट संघटनेने पत्रात नमूद केले आहे.

तांत्रिक तथ्ये आणि व्हिडिओ फुटेजची तपासणी आवश्यक
घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरील सुरक्षा कॅमेऱ्यांचे व्हिडिओ फुटेज निष्पक्ष तपासासाठी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, एअर इंडिया आणि बोइंग कंपनी दरम्यान दुर्घटनेपूर्वी झालेल्या सर्व तांत्रिक संदेशांचे सखोल विश्लेषण केले जावे. जर विमानात आधीपासूनच काही तांत्रिक त्रुटी किंवा विसंगती अस्तित्वात होत्या आणि वेळेत त्यावर उपाययोजना केली गेली नसेल, तर त्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

पायलटच्या प्रतिमेला धक्का; अंतिम अहवालात पारदर्शकता हवी
तपास पूर्ण होण्यापूर्वीच पायलटच्या 'आत्महत्ये'सारख्या चर्चांना किंवा अवाजवी तर्कवितर्कांना वाव देऊ नये, असे आवाहन FIP ने केले आहे. अशा अपुष्ट बातम्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळाल्यामुळे संपूर्ण पायलट समुदायाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. त्यामुळे अंतिम तपास अहवालात केवळ आणि केवळ सर्व तांत्रिक तथ्ये आणि सिम्युलेटर चाचण्यांच्या निष्कर्षांचाच समावेश केला जावा. या मागणीच्या पत्राची प्रत पायलट संघटनेने PMO, DGCA, नागरी विमानवाहू मंत्री आणि नागरी विमानवाहू सचिवांनाही पाठवली आहे.

हेही वाचा – Petrol-Diesel Rate Today: युद्ध थांबलं, होर्मुझही खुले; कच्च्या तेलाच्या किंमतीही घसरल्या, पण पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग?

1 वर्षापूर्वी घडली होती दुर्दैवी घटना
एअर इंडियाचे 'AI171' हे विमान 12 जून 2025 रोजी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच कोसळले होते. शहराच्या एका निवासी भागात झालेल्या या भीषण अपघातात 260 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अवघ्या 3 दिवसांपूर्वीच या अत्यंत दुर्दैवी घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number