Wednesday, January 14, 2026 12:12:35 PM

Vande Mataram Debate: 'मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल

मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरू यांनी वंदे मातरमचे तुकडे केले असा गंभीर आरोप मोदींनी सभागृहात केला.

vande mataram debate मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले’ लोकसभेत पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर हल्लाबोल

Vande Mataram Debate: ‘वंदे मातरम’च्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी लोकसभेत सुरू झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस तसेच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर तीव्र टीका केली. मुस्लिम लीगच्या दबावाखाली काँग्रेस अध्यक्ष असताना नेहरू यांनी वंदे मातरमचे तुकडे केले असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.

मुस्लिम लीगच्या दबावाखाली तडजोड; मोदींचा दावा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मोहम्मद अली जिना यांनी वंदे मातरमला विरोध केला तेव्हा तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाने त्यापुढे शरणागती पत्करली. नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वंदे मातरमची ‘आनंदमठ’ पार्श्वभूमी मुस्लिम समाजाला चिडवू शकते असे नेहरूंनी लिहिले होते. मोदींनी आरोप केला की, काँग्रेसने सामाजिक सौहार्दाच्या नावाखाली या राष्ट्रगीतास तुकडे करून त्याची अवहेलना केली. दरम्यान, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका करत पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसची धोरणे आजही तशीच आहेत. ती हळूहळू एमएमसी मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस बनत चालली आहे.  

हेही वाचा - Sunil Sahu Inspiring Story: दोन्ही हात गमावले, पण जिद्दीच्या जोरावर 18 पदके जिंकणारे सुनील साहू यांचा यशस्वी प्रवास

वंदे मातरमची ऐतिहासिक ऊर्जा  

पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम हे केवळ राजकीय घोषवाक्य नव्हते. ते स्वातंत्र्याच्या युद्धाचा मंत्र होता. भारतमातेला मुक्त करण्याच्या संघर्षाला या घोषणेने ऊर्जा दिली. ते पुढे म्हणाले की, 1857 नंतर ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे कठीण होत चालले होते, त्यामुळे त्यांनी ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली आणि बंगाल हे त्यांचे प्रयोगक्षेत्र बनले.

हेही वाचा - Vande Mataram Discussion: संसदेत ‘वंदे मातरम्’चा ऐतिहासिक आढावा; मोदी आणि शाह करतील नेतृत्व

मोदींनी सांगितलं की, जेव्हा वंदे मातरमने 50 वर्षे पूर्ण केली, तेव्हा देश गुलामीत होता. 100 वर्षे पूर्ण झाल्यावर देशावर आणीबाणी लादली गेली आणि संविधानाचा गळा दाबला गेला. आज 150 वा वर्धापनदिन साजरा करताना नवीन भारताच्या बांधणीसाठी वंदे मातरम प्रेरणादायी आहे. राष्ट्रगीताच्या 150 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1875 मध्ये बंगालमध्ये वंदे मातरमची रचना केली होती. स्वातंत्र्यसैनिकांना बळ देणारा हा मंत्र आज ‘विकसित भारता’चे नवस्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देतो. जसे 50 वर्षांपूर्वी कुणीतरी भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, तसेच आपण 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकतो, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  
 


सम्बन्धित सामग्री