अर्णबनंतर आठवडाभरातच दुसरे चक्रीवादळ धडकणार; बंगालच्या उपसागरात ‘मुरासु’चे संकट; एका वाद्यावरून पडले नाव

काही दिवसांपूर्वीच ‘अर्णब’ चक्रीवादळाचा तडाखा सहन केलेल्या पूर्व किनारपट्टीवर आता पुन्हा एकदा नव्या संकटाचे ढग दाटले आहेत. ‘मुरासु’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचे इशारे जारी करण्यात आले आहेत.

अर्णबनंतर आठवडाभरातच दुसरे चक्रीवादळ धडकणार; बंगालच्या उपसागरात ‘मुरासु’चे संकट; एका वाद्यावरून पडले नाव
Cyclone

Cyclone Murasu in Bay of Bengal November 2026: काही दिवसांपूर्वीच ‘अर्णब’ चक्रीवादळाचा तडाखा सहन केलेल्या पूर्व किनारपट्टीवर आता पुन्हा एकदा नव्या संकटाचे ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरात अवघ्या आठवडाभराच्या अंतराने दुसरे तीव्र चक्रीवादळ तयार झाले असून, हवामान विभागाने या नव्या वादळाचे नामकरण ‘मुरासु’ असे केले आहे. मागील 26 ऑक्टोबर रोजी निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाने 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडक दिली होती, ज्यामुळे ओडिशातील गंजम आणि गजपती जिल्ह्यांत अजूनही पूरसदृश परिस्थिती कायम आहे. या आधीच्या नुकसानीतून राज्य पूर्णपणे सावरलेले नसतानाच, ‘मुरासु’ चक्रीवादळाच्या धोक्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून डोंगराळ व सखल भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 3 नोव्हेंबरला धडकणार वादळ; ताशी 120 किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हे नवीन चक्रीवादळ 3 नोव्हेंबर रोजी सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या वादळाच्या तडाख्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर राहू शकतो, तर काही ठिकाणी वाऱ्याचे झोत ताशी 120 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळाची तीव्रता अधिक असल्याने मच्छिमारांना किमान 4 नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा देण्यात आला आहे. तसेच, जे नौकानयन किंवा मासेमारीसाठी समुद्रात गेले आहेत, त्यांना तात्काळ सुरक्षित बंदरात परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – रस्त्याचे काम सुरू असतानाच काळाचा घाला! विजेचा धक्का लागून 8 मजुरांचा मृत्यू, 5 जण गंभीर

दक्षिण भारतात अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; विविध भागांत रेड व ऑरेंज अलर्ट
संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचे इशारे जारी करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 2 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. रायलसीमा विभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, पुदुचेरी, तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः 3 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

तमिळनाडूतील पारंपारिक तालवाद्यावरून पडले ‘मुरासू’ नाव
या नव्या चक्रीवादळाचे नाव कसे पडले याबाबतची रंजक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार प्रादेशिक चक्रीवादळांच्या नामकरण प्रक्रियेत ‘मुरसू’ हे नाव भारताने सुचवले होते. तमिळ भाषेमधून घेतलेला हा शब्द एका पारंपरिक तालवाद्याशी (ढोल) संबंधित असून प्राचीन काळी गावोगावी व राज्यांमध्ये महत्त्वाची सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रसारित करण्यासाठी या वाद्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. एका बाजूला अर्णब वादळामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनता त्रस्त झालेली असताना ‘मुरासु’ वादळाचे नवे संकट समोर उभे ठाकले आहे. याचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – उड्डाण करण्यापूर्वीच इंडिगोच्या विमानाचं इंजिन अचानक बंद; 3 खासदारांसह 67 प्रवाशांचा…

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number