बंगळूर: Delhi Capitals ने संयमित आणि अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यात Royal Challengers Bengaluru वर 6 विकेट्सने विजय मिळवला. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा फायदा त्यांना चांगलाच झाला.
प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने 20 षटकांत 8 बाद 175 धावा केल्या. सुरुवातीला विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी वेगवान सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी अवघ्या 31 चेंडूंमध्ये 52 धावांची भागीदारी केली. विराट 19 धावांवर बाद झाला, मात्र फिल सॉल्टने आक्रमक खेळी कायम ठेवत 30 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याने 63 धावांची महत्त्वाची खेळी केली.
फिल सॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली. अक्षर पटेल याने 2 विकेट्स घेत फक्त 18 धावा दिल्या, तर लुंगी एनगिडी याने 2 विकेट्स घेत बंगळूरला धक्के दिले. कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
That trademark movement right from the start ?
A spot-on review to seal the deal ? Bhuvneshwar Kumar gets RCB off to a flying start ? Updates ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC | @RCBTweets | @BhuviOfficial pic.twitter.com/H5kZ9trF3X — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीसाठी केएल राहुल याने शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत डावाला भक्कम पाया दिला. त्याच्या खेळीत संयम आणि आक्रमणाचा योग्य मिलाफ दिसून आला. राहुल बाद झाल्यानंतर काही वेळ दिल्लीची गती मंदावली.
Soaking up the early pressure out in the middle ? Will the birthday boy KL Rahul stay till the end and take #DC home? ? Updates ▶️ https://t.co/vfJ6SccA9T#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvDC | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/mI0iXeI1na — IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
यानंतर अक्षर पटेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी डाव सावरला. अक्षर चांगल्या लयीत दिसत होता, मात्र त्याला गोळे आल्यामुळे मैदान सोडावे लागले. दुसरीकडे बेंगळुरूकडून जॉश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी शेवटच्या षटकांत अचूक गोलंदाजी करत सामना रंगतदार केला.
मात्र अखेरच्या टप्प्यात डेव्हिड मिलर दिल्लीसाठी तारणहार ठरला. शेवटच्या षटकात त्याने रोमारिओ शेफर्ड याच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकत सामन्याचा रंगच बदलून टाकला. त्यानंतर चौकार मारत त्याने दिल्लीचा विजय निश्चित केला.