Tuesday, December 09, 2025 01:30:44 PM

Flight Safety Rules: उड्डाण सुरक्षेसाठी DGCA सज्ज; GPS - उपग्रह नेव्हिगेशनमधील गोंधळावर तात्काळ माहिती देण्याचे निर्देश

अलीकडेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात GPS सिग्नलमध्ये हस्तक्षेप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दररोज सुमारे 1,500 उड्डाणे होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

flight safety rules उड्डाण सुरक्षेसाठी dgca सज्ज gps - उपग्रह नेव्हिगेशनमधील गोंधळावर तात्काळ माहिती देण्याचे निर्देश

नवी दिल्ली: भारताच्या विमान वाहतूक नियामक संस्थेने विमान महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation - DGCA) सर्व पायलट, एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि एअरलाईन्स यांना तातडीचे निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार, जर कोणत्याही उड्डाणादरम्यान GPS Spoofing किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम मध्ये काहीही अनियमितता दिसून आली, तर ती 10 मिनिटांच्या आत रिपोर्ट करणे बंधनकारक असेल. DGCA ने म्हटले आहे की, “हा निर्णय उड्डाण सुरक्षेचे आणि कार्यप्रणालीतील पारदर्शकतेचे संरक्षण करण्यासाठी घेतला गेला आहे.”

DGCA च्या आदेशानुसार, “जर कोणत्याही पायलट, ATC कंट्रोलर किंवा तांत्रिक कर्मचाऱ्यांना GPS सिग्नलमध्ये लोकेशन त्रुटी, नेव्हिगेशन चूक, सिग्नल लॉस किंवा स्पूफिंग डेटा आढळला, तर त्यांनी ती माहिती त्वरित म्हणजेच 10 मिनिटांच्या आत द्यावी.” अलीकडेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI Airport) परिसरात GPS सिग्नलमध्ये हस्तक्षेप (Interference) झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. येथे दररोज सुमारे 1,500 पेक्षा अधिक उड्डाणे होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

हेही वाचा: Amruta Fadnavis : 'देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यावर पैसेचं नसतात...'; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

DGCA ने सर्व संबंधित यंत्रणांना अहवालात तारीख, वेळ, विमानाचा प्रकार, नोंदणी क्रमांक, मार्ग, तसेच प्रभावित क्षेत्राचे निर्देशांक देण्यास सांगितले आहे. तसेच, कोणत्या प्रकारची गडबड (जसे Jamming, Spoofing, Signal Loss किंवा Integrity Error) झाली आणि कोणती उपकरणे प्रभावित झाली, याचाही तपशील अनिवार्य करण्यात आला आहे. जर शक्य असेल, तर अहवालासोबत System Log, Screenshot किंवा Flight Management System (FMS) मधील डेटा जोडण्यासही सांगण्यात आले आहे. नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2025 या काळात भारतात 465 GPS हस्तक्षेप आणि स्पूफिंग घटना नोंदल्या गेल्या आहेत, ज्यापैकी बहुतांश प्रकरणे अमृतसर आणि जम्मू सारख्या सीमावर्ती भागांत घडली आहेत.

DGCA सध्या दिल्ली विमानतळावरील अलीकडच्या स्पूफिंग घटनांची सखोल चौकशी करत आहे, ज्यातून या तांत्रिक गडबडीचा विस्तार किती मोठा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटना (International Civil Aviation Organization - ICAO) आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना (International Air Transport Association - IATA) यांनी वाढत्या GNSS Spoofing आणि Jamming घटनांबाबत इशारा दिला आहे. युरोपियन आयोगाने सप्टेंबर महिन्यात जाहीर केले होते की, बुल्गारिया दौर्‍यादरम्यान आयोगाध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन (Ursula von der Leyen) यांच्या विमानाचा GPS सिग्नल रशियाकडून जाम करण्यात आला होता.

हेही वाचा: PM E Drive Scheme : पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीत बदल घडणार; केंद्र सरकारकडून 1000 ई - बसेससाठी हिरवा कंदील

 

सम्बन्धित सामग्री