Amruta Fadnavis On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘कर्ली टेल्स’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या, “देवेंद्रजींच्या खात्यावर पैसेच नसतात, आमदार म्हणून जे वेतन मिळतं ते कुठे जातं हे मला देखील माहित नाही.” अमृता यांनी पुढे सांगितले की, “देवेंद्रजींना मध्यरात्री उठून काहीतरी खायची सवय आहे. ते रात्री उठून चॉकलेट खातात.” या मुलाखतीत त्यांनी वर्षा बंगल्यातील दिनक्रम, घरातील वातावरण, तसेच पती-पत्नीतील संवाद याबद्दल खुलेपणाने चर्चा केली.
या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला “साधेपणाचे उदाहरण” म्हटले, तर काहींनी “राजकारण्यांच्या कमाईवर प्रश्नचिन्ह” उपस्थित केले. राजकीय वर्तुळात या विधानावर हलकी खळबळ माजली असून, अनेकांनी फडणवीस दांपत्याच्या पारदर्शकतेचं कौतुक केलं आहे.
मुलाखतीदरम्यान, अमृता फडणवीस यांनी प्रश्न विचारण्यात आहे की, लग्नानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाले. त्यावर त्यांनी सांगितलं की, दिविजाचा जन्म झाल्यानंतर सर्व काही तिच्यासाठी असं सुरू झालं. देवेंद्रेजींनी तिचा जन्म झाल्यानंतर नोकरी न सोडता तिचा सांभाळ करण्याचा सल्ला मला दिला होता, असंही अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
तथापी, आर्थिक नियाजनाबाबत देवेंद्र फडणवीस अमृता यांना विचारतात का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, देवेंद्रजी आमदार होते तेव्हाही मी काम करत होते. त्यामुळे माझ्या पैशांच नियोजन मीच करते. देवेंद्रजीच्या खात्यात पैसेचं नसतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणून जो पगार मिळतो, तो पगारही कुठे जातो काय माहित? असा मजेशीर खुलासाही यावेळी अमृता फडणवीस यांनी केला. याशिवाय, अमृता फडणवीस यांना मोदीजी की देवेंद्रजी यापैकी आवडते व्यक्ती कोण? असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की, मोदीजी मला खूप आवडतात. तसेच पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मला सर्वात जास्त राग येतो, असंही यावेळी अमृता फडणवीस यांनी नमूद केलं.