नवी दिल्ली: एअर इंडियाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियावर निष्काळजीपणासाठी कडक कारवाई केली आहे. सुरक्षेत निष्काळजीपणा केल्यामुळे 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांवरून काढून टाकण्यात आले आहे. डीजीसीएने एअरलाइनवर अधिक कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. सुरक्षा मानकांमधील मोठ्या त्रुटीला गांभीर्याने घेत डीजीसीएने एअर इंडियाच्या विभागीय उपाध्यक्षासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्तव्यावरून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वांना क्रू ड्युटीशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - मोठा अपघात टळला! 'Mayday' कॉलनंतर इंडिगोच्या विमानाचे बेंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग
दरम्यान, 20 जून रोजी जारी केलेल्या आदेशात, डीजीसीएने टाटा समूहाच्या मालकीच्या एअरलाइनला त्वरित अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यास सांगितले आहेत. एअर इंडियाने डीजीसीएचे निर्देश स्वीकारले असून आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे म्हटले आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'आतापासून, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) थेट एकात्मिक ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (आयओसीसी) वर लक्ष ठेवतील. सुरक्षा मानके आणि प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले जाईल.'
हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमान बुकिंगमध्ये मोठी घट; 15 टक्क्यांनी स्वस्त झाली तिकिटे
एअर इंडियाला डीजीसीए कडक इशारा -
डीजीसीएला चौकशीत असे आढळून आले की, एअर इंडियाने परवाना आणि क्रू विश्रांतीशी संबंधित नियमांचे उल्लंघन करूनही अनेक उड्डाणे चालविली. तथापी, याप्रकरणी, डीजीसीएने इशारा दिला आहे की भविष्यात अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती झाल्यास, परवाना निलंबन आणि उड्डाण ऑपरेशन्सवर बंदी यासारखी कठोर कारवाई केली जाईल.