Wednesday, May 14, 2025 11:18:39 PM

भूस्खलनामुळे 1000 हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये अडकले

उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे 1 हजाराहून अधिक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 हून अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे अडकले आहेत.

भूस्खलनामुळे 1000 हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये अडकले

सिक्कीम: सध्या, उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे 1 हजाराहून अधिक पर्यटक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 हून अधिक पर्यटक भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे अडकले आहेत. यात पुणे, मुंबई, अकोला आणि नागपूर येथील पर्यटकांचा समावेश आहे. या भूस्खलन आणि हिमस्खलनामुळे महाराष्ट्रातील अकोलामधील चार नामांकित डॉक्टरांच्या कुटुंबातील 16 जण लाचुंगमध्ये अडकले आहेत. दसरम्यान, अडकलेल्या चारही कुटुंबीयांनी आमदार आमोल मिटकरी यांच्याशी संपर्क साधला. यासंदर्भात, आमदार अमोल मिटकरींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आणि गिरीश महाजन यांच्याशी संपर्क केला आहे. राज्य सरकारकडून या लोकांच्या रेस्क्यूसाठी प्रयत्न सुरू आहेत. माहितीनुसार, सिक्कीममधील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा: बलूच लिबरेशन आर्मीचा पाक सैन्यावर हल्ला, 10 पाकिस्तानी सैनिक ठार

मुसळधार पावसामुळे भूस्खलन

उत्तर सिक्कीमच्या मुनशिथांग प्रदेशात सततच्या मुसळधार पावसामुळे लाचेन-चुंगथांग मार्गावर आणि लेमा/बॉब परिसरात भूस्खलन झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील महत्वाच्या भागांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे 1000 हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये अडकले आहेत. येथे सतत पाऊस पडत आहे आणि रस्ते ढिगाऱ्यांनी भरलेले आहेत. पूर परिस्थितीमुळे अनेक वाहनेही अडकली आहेत, त्यामुळे हालचाल करणे अशक्य झाले आहे.

मांगन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोनम देचू भुतिया यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, 'लाचेन-चुंगथांग रस्त्यावरील मुनशिथांग आणि लाचुंग-चुंगथांग रस्त्यावरील लेमा/बॉब येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. तसेच उत्तर सिक्कीममध्ये सतत पाऊस पडत आहे. खरंतर चुंगथांगकडे जाणारा रस्ता खुला आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रात्रीच्या वेळी तिथे जाणे जवळपास अशक्य आहे.'


सम्बन्धित सामग्री