आता दर शनिवारी बंद राहणार बँका? अर्थ मंत्रालयाच्या नावाने व्हायरल होणाऱ्या दाव्यामागचं सत्य समोर

सध्या सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या नावाने एक कथित आदेश तुफान व्हायरल होत आहे. या आदेशात सरकारने बँक कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत सर्व बँकांसाठी दर शनिवारी सुट्टी जाहीर केल्याचा दावा केला जात आहे.
आता दर शनिवारी बंद राहणार बँका? अर्थ मंत्रालयाच्या नावाने व्हायरल होणाऱ्या दाव्यामागचं सत्य समोर
आता दर शनिवारी बंद राहणार बँका? व्हायरल मेसेजबाबत मोठी अपडेट

PIB Fact Check: बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवसांचा कामाचा आठवडा आणि दर शनिवारी सुट्टी मिळावी, या मागणीसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र, ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने (IBA) सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर संप पुढे ढकलण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या नावाने एक कथित आदेश तुफान व्हायरल होत आहे. या आदेशात सरकारने बँक कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत सर्व बँकांसाठी दर शनिवारी सुट्टी जाहीर केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्थ मंत्रालयाच्या नावाने बनावट अधिसूचना व्हायरल

सोशल मीडियावर अर्थ मंत्रालयाच्या ‘आर्थिक सेवा विभागा’च्या नावाने एक राजपत्र अधिसूचना फिरत आहे. या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’सह (SBI) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी प्रत्येक शनिवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. हा संदेश वेगाने पसरल्याने बँक ग्राहकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर असा कोणताही आदेश आढळलेला नाही.

‘पीआयबी फॅक्ट चेक’कडून सत्याचा उलगडा

या व्हायरल दाव्याची दखल घेत केंद्र सरकारच्या ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या तथ्य-तपासणी पथकाने यामागचे सत्य समोर आणले आहे. ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, “सोशल मीडियावर शेअर केले जाणारे बँक सुट्टीच्या घोषणेबाबतचे दस्तऐवज पूर्णपणे बनावट आहे.” तसेच सरकारी बँकांसाठी दर शनिवारी सुट्टी घोषित करणारी कोणतीही अधिसूचना अर्थ मंत्रालयाने जारी केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ‘1 तारीख आली की मनात धडकी भरते…’; LPG सिलेंडरच्या दरात वाढ होताच रोहिणी खडसेंचं खोचक ट्विट

अद्याप कोणताही अधिकृत आदेश नाही

‘पीआयबी फॅक्ट चेक’ने नागरिकांना आणि बँक ग्राहकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. बँका दर शनिवारी बंद राहतील असा कोणताही आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेला नाही. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याच्या उद्देशाने काही समाजकंटकांनी हे बनावट पत्र तयार केले आहे. त्यामुळे बँकांच्या कामकाजाच्या वेळा आणि सुट्ट्या नेहमीप्रमाणेच लागू राहतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version