Pahalgam Terror Attack Video
Edited Image, X/@mishrarajiv08
पहलगाम: मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या भयानक हत्याकांडात दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हा दहशतवादी हल्ला तीन पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवाद्यांनी संयुक्तपणे केला.
पहलगाम हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल -
सध्या सोशल मीडियावर या भयानक हत्याकांडाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - 'दहशतवादाच्या सूत्रधारांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे'; पंतप्रधान मोदींचा कडक शब्दांत इशारा
दहशतवादी नरसंहार करताना कॅमेऱ्यात कैद -
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक हत्याकांडाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दहशतवादी नरसंहार करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये पहलगाम मैदानात दहशतवादी हातात स्वयंचलित बंदुका घेऊन पर्यटकांवर हल्ला करत असल्याचे दिसून येत आहे.
या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी एकूण 26 जणांचा बळी घेतला.
हेही वाचा - भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक! भारतात पाक सरकारचे एक्स खाते ब्लॉक
पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून सुमारे 10 मिनिटे अंदाधुंद गोळीबार -
प्राप्त माहितीनुसार, पहलगाम मैदानावर पाच दहशतवाद्यांनी सुमारे 10 मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या 5 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यांचे रेखाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण देश या दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त करत आहे आणि बदला घेण्याची मागणी करत आहे.