दुबई-इस्रायल विमानातील हल्लेखोर सह-वैमानिकाची ओळख पटली; सीरिया कनेक्शनसह बॅगेत सापडले धक्कादायक साहित्य

तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अलहमामीने हा संपूर्ण दहशतवादी कट कोणत्याही सहकाऱ्याशिवाय एकट्यानेच आखला असावा.

दुबई-इस्रायल विमानातील हल्लेखोर सह-वैमानिकाची ओळख पटली; सीरिया कनेक्शनसह बॅगेत सापडले धक्कादायक साहित्य
flydubai

Smit Machhar Attack: दुबईहून इस्रायलच्या दिशेने उड्डाण करणाऱ्या ‘फ्लायदुबई’ विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्येच धारदार शस्त्राने हल्ला करून विमान क्रॅश करण्याचा भीषण प्रयत्न करणाऱ्या सह-वैमानिकाची ओळख आता पटली आहे. ‘अल अरेबिया’ आणि ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, हमाम अलहमामी (Hammam Alhamami) असे या ओमानच्या नागरिक असलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अलहमामीचे सीरियातील कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’शी थेट कनेक्शन असल्याचे तपासात उघड झाले आहे.

अल-कायदा कनेक्शन आणि पॅलेस्टाईन समर्थक साहित्य
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अलहमामी हा अल-कायदाच्या कट्टरपंथी विचारसरणीच्या प्रभावाखाली आला होता आणि त्याने अनेक जहाल धार्मिक नेत्यांच्या गुप्त भेटीही घेतल्या होत्या –

– हल्लेखोर व्यक्तीच्या बॅगेत ‘फ्री-पॅलेस्टाईन’ समूहाशी संबंधित पत्रके आणि इतर पॅलेस्टाईन समर्थक साहित्य सापडले आहे.
– सीरियातील वास्तव्यादरम्यान तो अनेक कट्टरपंथी गटांच्या संपर्कात आल्याचे उघड झाले आहे.
– त्याच्या या जहाल आणि संशयित वर्तणुकीमुळे ओमानच्या राष्ट्रीय विमान कंपनीने त्याला गेल्या वर्षीच सेवेतून काढून टाकत त्याच्यावर बंदी घातली होती.

हेही वाचा – आकाशात कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं? फ्लाय दुबईच्या विमानामधील प्लंबरने सांगितला थरार

एकट्यानेच आखला होता कट; इस्रायली गुप्तचर यंत्रणांचे प्रश्न
तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अलहमामीने हा संपूर्ण दहशतवादी कट कोणत्याही सहकाऱ्याशिवाय एकट्यानेच आखला असावा. परंतु, इतर आंतरराष्ट्रीय आणि परदेशी विमान कंपन्यांमध्येही असा धोका निर्माण होऊ शकतो का, याची सखोल पडताळणी आता सुरू करण्यात आली आहे.

विमान वाहतूक सुरक्षेबाबत गंभीर शंका
ज्या देशासोबत इस्रायलचे कोणतेही औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत, त्या ओमानच्या अशा कट्टरपंथी पार्श्वभूमी असलेल्या संशयित नागरिकाला ‘फ्लायदुबई’च्या क्रूमध्ये समाविष्ट कसे करून घेण्यात आले, असा अत्यंत गंभीर प्रश्न इस्रायली गुप्तचर संस्थांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण सुरक्षेच्या त्रुटीबाबत आणि हल्ल्यामागील मुख्य कारणांचा छडा लावण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास वेगाने सुरू आहे.

हेही वाचा – ‘7500’ हायजॅक कोड अन् वैमानिकांमधील वाद… दुबई-तेल अवीव विमानात अपहरणाचा संशय; इमर्जन्सी लँडिंगमुळे खळबळ

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number